![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/61/Maicon_Douglas_Sisenando_-_Inter_Mailand_%25281%2529.jpg/640px-Maicon_Douglas_Sisenando_-_Inter_Mailand_%25281%2529.jpg&w=640&q=50)
मैकों सिसेनांदो
From Wikipedia, the free encyclopedia
मैकों दग्लस सिसेनांदो उर्फ मैकों (पोर्तुगीज: Maicon Douglas Sisenando; २६ जुलै १९८१ (1981-07-26)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००३ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला मैकों २०१० व २०१४ फिफा विश्वचषक, २००५ व २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक तसेच २००४, २००७ व २०११ कोपा आमेरिका ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/61/Maicon_Douglas_Sisenando_-_Inter_Mailand_%281%29.jpg/640px-Maicon_Douglas_Sisenando_-_Inter_Mailand_%281%29.jpg)
क्लब पातळीवर मैकों २००४-०६ दरम्यान मोनॅकोच्या लीग १ मधील ए.एस. मोनॅको एफ.सी., २००६-१२ दरम्यान सेरी आमधील इंटर मिलान तर २०१२-१३ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटी तर २०१३ पासून ए.एस. रोमा ह्या क्लबांसाठी खेळत आहे.