उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागात सांघिक प्रजासत्ताक From Wikipedia, the free encyclopedia
मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस) हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते.
मेक्सिको Estados Unidos Mexicanos United Mexican States मेक्सिकोची संयुक्त संस्थाने | |||||
| |||||
राष्ट्रगीत: मेक्सिकानोस, अल् ग्रितो दे ग्वेरा | |||||
मेक्सिकोचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
मेक्सिको सिटी | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
- राष्ट्रप्रमुख | क्लॉदिया शाइनबॉम पार्दो | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | सप्टेंबर १५,१८१० | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १९,७२,५५० किमी२ (१५वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | २.५ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ११,१२,११,७८९ (११वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ५५/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १,१४३ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | मेक्सिकन पेसो(MXN) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | MX | ||||
आंतरजाल प्रत्यय | .mx | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५२ | ||||
प्राचीन नगरी ‘[[देवदिवाकान] ‘ हिचे दोन हजार वर्षांपूर्वीच्या या महानगरीतील अवशेष आजही पहायला मिळतात.येथील चंद्रमंदिरात ललोक आणि केल्सल कोल्ला या देवतांची मंदिरे आहेत. केल्सल हा पवित्र पक्षी आणि कोल म्हणजे सर्प.पृथ्वी आणि आकाश यांच्या एकत्वाचे प्रतीक असलेली ही देवता. पुरोहितांचे प्रासाद तसेच नगरवासीयांची घरे याच परिसरात होती.उत्सवप्रसंगी लोक येथे एकत्र जमत असत.
मेक्सिको उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागात असून त्याचा आकार साधारणत: त्रिकोणी आहे. वायव्येपासून ईशान्य टोकापर्यंतची लांबी अंदाजे ३,००० कि.मी. व रुंदी उत्तरसीमेवर २,००० कि.मी. तर तेहुआन्तेपेकच्या सामुद्रधुनीजवळ २२० कि.मी. इतकी आहे. मेक्सिकोचा मध्य भाग एक उंच पठार आहे. पठाराच्या पूर्व-पश्चिमेस पर्वतरांगा असून त्यापलिकडे तटीय प्रदेश आहेत. मेक्सिकोचे दोन द्वीपकल्प, पश्चिमेस बाहा कॅलिफोर्निया व पूर्वेस युकातन यांची भौगोलिक रचना वेगळीच आहे. १,२५० कि.मी. लांबीचा बाहा कॅलिफोर्निया पॅसिफिक महासागर व कॅलिफोर्नियाच्या अखाताच्या मधली चिंचोळी पट्टी आहे तर युकातन मेक्सिकोचा अखात व काम्पीचीच्या अखातामधील भूभाग आहे.
मेक्सिकोच्या भौगोलिक रचना व हवामान यात वैविध्य आहे. सोनोराच्या दगड-धोंड्यांचा वाळवंटापासून सिनालोआच्या घनदाट जंगलापर्यंत सगळ्याप्रकारचे हवामान येथे आढळते.
उत्तर सीमेवरील रियो ब्राव्हो देल नोर्ते (रियो ग्रान्दे), दक्षिण सीमेवरील उसुमासिन्ता व ग्रिहाल्वा, बाल्सास, पानुको, याक्वी वगैरे मक्सिकोतील प्रमुख नद्या आहेत.
मेक्सिको ३१ राज्य व १ केंद्रशासित प्रदेशात विभागलेले आहे.
प्रत्येक राज्याचे स्वतंत्र संविधान असून विधिमंडळ आहे. राज्याचे नागरिक राज्यपाल व विधायक निवडतात.
मेक्सिको सिटीचा केंद्रशासित प्रदेश वगळता राज्ये पुढीलप्रमाणे -
नाव | राज्य | वस्ती |
---|---|---|
मेक्सिको सिटी | केंद्रशासित प्रदेश | २,२०,००,००० |
ग्वादालाहारा | शालिस्को | ४७,००,००० |
मोन्तेरे, मेक्सिको | नुएव्हो लिओन | ३६,००,००० |
पेब्ला | पेब्ला राज्य | २६,००,००० |
तिहुआना | बाहा कॅलिफोर्निया | १५,००,००० |
लिओन | ग्वानाहुआतो | १२,००,००० |
तोलुका | मेक्सिको | १२,००,००० |
सिउदाद हुआरेझ | शिवावा | ११,००,००० |
तोरेओन | क्वाह्विला | ११,००,००० |
सान लुइस पोतोसी | सान लुइस पोतोसी | ८,००,००० |
अलिकडच्या जनगणनेनुसार मेक्सिकोची लोकसंख्या १० कोटी ३० लाख आहे. जगातील स्पॅनिश बोलणाऱ्या देशांपैकी सगळ्यात जास्त लोकसंख्या मेक्सिकोची आहे.[1]
मेक्सिको सिटी शहरात काही प्रमाणात हिंदू, जैन आणि लिंगायत लोक आढळतात.[ संदर्भ हवा ]
मय स्थापत्य २५०० वर्षापूर्वी मध्ये अमेरिकेतील सा-या देशात मय संस्कृतीचा प्रभाव होता. या सभ्यतेला इतिहासकारांनी ‘ओल्मेक’ असे नाव दिले होते. या परिसरात २० लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात पिरॅमिड आकाराची हजारो मंदिरे आहेत. चिचेन इत्सा ही १२०० वर्शापूर्वीची मयनगरी होती.योद्ध्यांच्या मंदिरासाठी ते प्रसिद्ध होते.यावर कमळ आणि स्वस्तिके यांची शिल्पे होती.[2]
मय मंदिरांचे वैशिष्ट्य असं की दर ५२ वर्षांनी त्याची उंची वाढविली जात असे.जुने मंदिर तसेच ठेवून त्यावर नवीन मजला चढविला जात असे. खगोलशास्त्राच्या तत्त्वावर त्याची उभारणी होत असे. ४५ अंशात चढत जाणारे त्रिकोणक्षेत्र ,सूर्योदय आणि सूर्यास्ताची किरणे विशिष्ट कोनातून मंदिरात येण्याची योजना,पायऱ्या ,मूर्ती प्रकोष्ठ यांची ३६५ ही संख्या ही वैशिष्ट्ये. हे स्थापत्य अध्यात्मासह आकाश निरीक्षण,नक्षत्र अवलोकन आणि कालगणना यांच्याशी संबंधित होते.[3]
इ.स. १३७४ मध्ये अस्तीकांचा नायक अकंपिस्तली याने तक्षक साम्राज्याचा पाया घातला.त्याची तेनोसतीतील्लन ही राजधानी सुंदर जलनगरी होती.सर्वजणचीत्या नौकांचा वापर करीत.राजमार्गाच्या दुतर्फा समृद्ध बाजारपेठ होती.लिखित भूमिलेख,कायदा,लेखागार ,विधी संहिता,स्थापत्य,शिक्षण सर्वच बाबतीत आस्तिक हे समकालीन युरोपीय सभ्यतेच्या पुढे होते. धर्म हा या संस्कृतीचा केंद्रबिंदू होता. हे लोक स्वतःला सूर्यपुत्र मानीत.यांच्या पंचांगात चतुर्युग कल्पना होती.आस्तिक पंचांग कोरलेले १२ फूट व्यासाचे अखंड पाषाणाचे कालचक्र प्राप्त झाले आहे, त्याच्या मध्यावर सूर्य आहे. यांचा सर्वश्रेष्ठ देव होता वानब कू. तो विश्वनिर्माता होता. किनिश आवा हा सूर्यदेव,इक्षेल हा चंद्रदेव, पर्जन्यदेव चक, समृद्धीची देवी अह मनु हे त्यांचे देव होते.[4]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.