जलद तथ्य मालोजी भोसले ...
मालोजी भोसले
मालोजी भोसले
पूर्ण नाव मालोजीराजे बाबाजीराजे भोसले
वेरूळ
वडील बाबाजीराजे भोसले
पत्नी उमाबाई
संतती शहाजीराजे भोसले,
शरीफजीराजे भोसले
राजघराणे भोसले
चलन होन
बंद करा

बालपण

मालोजीरावांचे लग्न

मालोजी यांचे लग्न फलटणचे देशमुख वणंगपाळ निंबाळकर यांची कन्या ऊमाबाई हिच्याशी झाले होते. त्यांना लवकर संतान होईना म्हणून मालोजी व उमाबाई यांना वाईट वाटत होते. त्यांनी नगरचा पीरशहा शरीफ़ यांस नवस केला. त्याच्या अनुग्रहाने उमाबाईला १५९४ व १५९७ला दोन मुले झाली. त्यांची नावे शहाजीशरीफजी अशी ठेवण्यात आली. पुढे शहाजीना थोरले संभाजी, शिवाजीव्यंकोजी ही ३ मुले झाली.

कारकीर्द

बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने औरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाण निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर धारातीर्थी पडले. भोसले घराण्यातील वीराच्या पराक्रमाचे ’पहिले स्मारक’ मालोजीच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले गेले.

शहाजींचे लग्न

मालोजींचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवांची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळत असत. पण घरातील विरोधामुळे लखुजींनी संबंध नाकारले. मालोजींना कमी लेखले गेले. मालोजी पुन्हा वेरूळला आले. तिथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून मालोजींनी हजारो घोडे घेतले व आपली फौज तयार ते करून सरदार बनले. निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले व लखुजी जाधवांनी आपली मुलगी शहाजींना देऊन सोयरीक जमवली.

भोसले यांची वंशावळ

१. सजनसिंघ २. दिलीपसिंघ ३. सिंघजी ४. 'भोसाजी' ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रूपसिंघ ९. भूमींद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजी १५. बाबाजी १६. मालोजी १७. शहाजी १८. शिवाजी १९. संभाजी २० शाहू....

संदर्भ

"राजा शिवछत्रपती", लेखक : बाबासाहेब पुरंदरे "ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे", स्थळ : [www.manase.org] सिद्धान्त विजयः पृष्ट ८४-८५ आनंद घोरपडे लिखित "शिवछत्रपती समज-अपसमज" प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' लिखित "क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज"

[[वर्ग:छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ]]




Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.