![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/92/Flag_of_Mali.svg/langmr-640px-Flag_of_Mali.svg.png&w=640&q=50)
माली
आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश / From Wikipedia, the free encyclopedia
मालीचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Mali हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत द'ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. १२,४०,१९२ चौरस किमी क्षेत्रफळ असणाऱ्या मालीची लोकसंख्या सुमारे १.४५ कोटी आहे. बामाको ही मालीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मालीमधील बहुतांशी लोकवस्ती दक्षिण भागात नायजर व सेनेगाल नद्यांच्या काठावर वसलेली आहे. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
माली République du Mali (फ्रेंच) मालीचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Un peuple, un but, une foi" एक लोक, एक ध्येय, एक श्रद्धा | |||||
राष्ट्रगीत: Pour l'Afrique et pour toi, Mali | |||||
![]() | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
बामाको | ||||
अधिकृत भाषा | फ्रेंच | ||||
सरकार | अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
स्वातंत्र्य | |||||
- फ्रान्सपासून मालीचा संघ ह्या नावाने, सेनेगालसोबत | ४ एप्रिल १९६० | ||||
- स्वतंत्र माली | २२ सप्टेंबर १९६० | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १२,४०,१९२ किमी२ (२४वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.६ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | १,४५,१७,१७६[1] (६७वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ११.७/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १६.७७२ अब्ज[2] अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १,२५१ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.३७१ (कमी) (१७८वा) (२००७) | ||||
राष्ट्रीय चलन | पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी + ०:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | ML | ||||
आंतरजाल प्रत्यय | .ml | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | २२३ | ||||
![]() | |||||
१९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी मालीवर सत्ता प्रस्थापित केली व फ्रेंच सुदान ह्या वसाहतीमध्ये मालीचा समावेश केला. १९६० साली मालीला स्वातंत्र्य मिळाले.
शेती हा मालीमधील सर्वात मोठा उद्योग असून कापसाची निर्यात हा मालीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील सर्वात गरीब व कर्जबाजारी देशांपैकी एक असणाऱ्या मालीमधील ६४ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली राहते.[3] युरोपियन संघ, जागतिक बँक इत्यादींकडून मालीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनुदान मिळते.
फ्रेंच ही मालीची राष्ट्रभाषा असून येथे ४० पेक्षा अधिक स्थानिक भाषा वापरल्या जातात. मालीमधील ९० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे