मायकेल केन
From Wikipedia, the free encyclopedia
सर मायकल केन (१४ मार्च, इ.स. १९३३:लंडन, इंग्लंड - ) हे एक प्रसिद्ध इंग्रजी अभिनेते आहेत. केनने शंभरापेक्षा जास्त चित्रपटांतून काम केले आहे तसेच १९६०पासून प्रत्येक दशकात अकादमी पारितोषिकांसाठी (उत्कृष्ट अभिनेता) त्यांच्या नावाचे नामांकन झाले आहे. हॉलिवूडचे १९६०, ७० आणि ८० चे दशक केन ह्यांच्या अभिनय कौशल्य, सादरीकरण आणि टिकांनी गाजले आहेत. २००० साली राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या हस्ते त्यांना मानाचा नाइटहूड(सर) हा किताब त्यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल बहाल करून त्यांना गौरविण्यात आले. केन हे त्यांच्या कॉकनी उच्चारशैली साठी प्रसिद्ध आहेत.
जलद तथ्य मायकल केन, जन्म ...
मायकल केन | |
---|---|
![]() Michael Caine in 2008 | |
जन्म |
मॉरिस जोसेफ मिकलव्हाईट ,जुनियर १४ मार्च, इ.स. १९३३ लंडन, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व |
ब्रिटिश ![]() |
कार्यक्षेत्र | चित्रपट, हॉलिवूड |
कारकीर्दीचा काळ | सन १९५६-पासून -आतापर्यंत |
भाषा | इंग्रजी |
पुरस्कार | ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर (सर /नाईटहुड) |
पत्नी |
पॅट्रीशिआ हेन्स (१९५५-१९६२) शकिरा बक्श (१९७३–आतापर्यंत) |
बंद करा
केनचे मूळ नाव मॉरिस जोसेफ मिकलव्हाईट, जुनियर आहे.