महावेली नदी
श्रीलंकेतील सर्वात लांब नदी / From Wikipedia, the free encyclopedia
महावेली ही ३३५ किमी (२०८ मैल) लांबीची नदी असून ती श्रीलंकेतील सर्वात लांब नदी आहे. स्थानिक भाषेत या नदीला महावेली गंगा असे म्हणले जाते.[ संदर्भ हवा ] या नदीचे पाणलोट क्षेत्र विस्तीर्ण असून बेटाच्या एकूण भागापैकी जवळजवळ एक पंचमांश भाग त्याने व्यापला आहे. या नदीचा उगम देशाच्या पश्चिमेकडील हॅटन पठारावर पोलवतुरा या दुर्गम गावात होतो.[1] ही नदी ईशान्य किनाऱ्यावरील त्रिंकोमालीच्या खाडीमार्गे बंगालच्या उपसागराला मिळते. त्रिंकोमाली हे नैसर्गिक बंदर असून जगातील खोल समुद्रावरील बंदरांपैकी एक आहे.[2]