मराठी भाषा
भारतीय भाषा / From Wikipedia, the free encyclopedia
मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. गोवा, गुजरात सारख्या राज्यातही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते. गोव्यात मराठीला समृद्ध असा इतिहास आहे.[1]
मराठी भाषा | |
---|---|
मराठी | |
"मराठी" - देवनागरी आणि मोडी लिपीमध्ये | |
प्रदेश | महाराष्ट्र, गोवा, काही प्रमाणात- गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली |
लोकसंख्या | १३ कोटी |
क्रम | ९ |
बोलीभाषा | कोळी, आगरी, माणदेशी, वऱ्हाडी, तंजावर मराठी, कुणबी, महाराष्ट्रीय कोंकणी |
भाषाकुळ | |
लिपी | देवनागरी (प्रचलित), मोडी लिपी (एके काळची) |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
भारत राज्यभाषा- महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | mar |
ISO ६३९-२ | mr |
मराठी भाषा बोलली जाणारा प्रदेश लाल रंगात दर्शविलेला आहे |