हिंदू किंवा जैन धर्मीयांचे प्रार्थनास्थळ From Wikipedia, the free encyclopedia
मंदिर हा शब्द बहुतांश वेळा हिंदू किंवा जैन धर्माच्या प्रार्थनास्थळासाठी वापरला जातो.
परंतु काही वेळेस (धार्मिक अर्थ वगळता) जेथे त्या वास्तूचे पावित्र्य किंवा मोठेपण दाखवायचे असते अश्या इतर ठिकाणीदेखील मंदिर हा शब्द वापरला जातो. उदा. आरोग्य मंदिर, योग मंदिर, ध्यान मंदिर, विद्येचे मंदिर.
मंदिर हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे मूर्तीची पूजा केली जाते. मंदिरालाच देवालय असेही म्हणले जाते.
भारतातील ज्योतिर्लिंगे, पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी, सोमनाथ, कोणार्क सूर्य मंदिर, काशी विश्वनाथ, इत्यादी ही मंदिरे, तसेच महाराष्ट्रातील सिद्धिविनायक, शिरडीचे साईबाबा मंदिर, अकरा मारुती मंदिरे, अष्टविनायक मंदिरे, परशुराम मंदिर,लोणादित्य मंदिर आदी देवस्थाने प्रसिद्ध आहेत.
मंदिरात मूर्ती बसवल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भारतीय पद्धत आहे. या प्रसंगी 'माझे प्राण मी तुझ्यात म्हणजे मूर्तीमध्ये ठेवत आहे, त्यामुळे तुझे दिव्यत्व, तुझे गुण माझ्या प्राणांत उतरोत' अशी प्रार्थना केली जाते.
भक्तांचे सत्संगाचे ठिकाण असे मंदिराचे स्वरूप असते. पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती.
पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. हस्तलिखिते, भूर्जपत्रे आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. गुरुवायुर मंदिर, जालना येथील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदीचे देऊळ अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे आढळते. तिरुपती बालाजी, पॉंडिचेरीचा अरविंद आश्रम, दक्षिणेश्वर कालीमंदिर (हे रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र आहे), अशा काही संस्थांनी ज्ञानदानाचे कार्य पुढे नेले आहे व ती आज विद्यापीठाचा दर्जा असलेली मंदिरे आहेत. तसेच स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालतात.
भारतीय मंदिर उभारणीचे, त्यातील शिल्पकलेच्या वैभवाचे लावण्यमयी दर्शन घेण्यासाठी पट्टदकल हे महत्त्वाचे केंद्र आहे. काशी तसेच भुवनेश्वर ही प्राचीन मंदिरांची शहरे आहेत. काशीत सुमारे १६५४ मंदिर आहेत. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण अठरा विभाग कार्यरत असत. ते खालील प्रमाणे आहेत.
वास्तुशिल्पांत भुवनेश्वर, कोणार्क, खजुराहो वगैरे मंदिरसमुच्चय त्या मंदिरांचे आकार व वास्तुशिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम आणि जीर्णोद्धार केला आहे. त्यामुळे तत्कालीन शिल्पकलेचा ठसा मंदिर निर्मितीवर उमटलेला दिसून येतो. नागर, द्राविड आणि वेसर अशा मंदिराच्या स्थापत्य शैली आहेत.
यादवांचा प्रधान हेमाडपंत यांनी प्रचलित केलेली ही शैली आहे. चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, ही काही ठळक हेमाडपंती शैलीतील मंदिरे आहेत. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर ही हेमाडपंती पद्धतीत बांधलेली आहेत.
हा हिंदू मंदिरांचा सर्वात प्राचीन प्रकार आहे. याच्या शिखराचा भाग वरच्या दिशेला निमुळता होत जाणारा असतो. मंदिराचे आठ भाग असतात. - १. मूल (पाया), २. मसूरक (चौथरा), ३. जंघा (भिंत), ४ .कपोत, ५. गल, ६. शिखर, ७. आमलक, ८. कुंभ (कळस) {१}
कृष्णानदीपासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशांत ही शैली आढळते. या मंदिराच्या शिखरात अनेक मजले बांधलेले असतात. या शैलीच्या मंदिराचे चार भाग असतात. - १. गोपुर, २.मंडप, ३.विमान, ४.स्तंभयुक्त वेदिका{२}
वेसर शैलीतील मंदिरे पश्चिम भारतात आढळतात. यांची रचना ताराकृती जोत्यावर केलेली असते.{३}
या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या परिसरात आढळतात.
१. भारतीय संस्कृती कोश खंड चौथा २.भारतीय संस्कृती कोश खंड चौथा ३.भारतीय संस्कृती कोश खंड चौथा
मंदिरामध्ये विविध शिल्पे आढळून येतात. त्यातील काही प्रतीके ही भिंतींवर कोरलेली आढळतात :
सुरांगना
धरणाचे बांधकाम झाल्याने अनेक मंदिरे पाण्याखाली जातात. त्यांतली काही फुटून-तुटून नष्ट होतात आणि काही बऱ्या अवस्थेत तग धरून राहतात. उन्हाळ्यामधे धरणाचे पाणी जसजसे संपुष्टात येते तसतशी पाण्याखालची मंदिरे दिसू लागतात. अशाच काही मंदिरांची ही नावे :
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.