मंगलाजोडी
भारतातील एक गाव / From Wikipedia, the free encyclopedia
मंगलाजोडी हे ओरिसा राज्यातील खोरधा जिल्ह्यातील एक गाव असून हे चिल्का सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. येथील मोठा पाणथळ, दलदलीचा प्रदेश अनेक स्थलांतरीत पक्ष्यांना आकर्षित करतो. हे गाव स्थलांतरीत तसेच पाणपक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.