भीमबेटका
भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात. / From Wikipedia, the free encyclopedia
भीमबेटका ही एक पुरातन जागा व जागतिक वारसा स्थान असून, हे ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे भोपाळ पासून ४५ किमी अंतरावर आहे. भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात. भीमबेटकाचे नाव हे अतिबलवानभीम या महाभारतातील पात्राबरोबर जोडले जाते.[1] हे नाव भीमाची बैठक -भीमबैठक-भिमबेटका असे अपभ्रंश होऊन बनलेले असावे असे काही मानतात. मध्य प्रदेशामध्ये ह्या ठिकाणाला भीमबैठक याच नावाने ओळखतात.[1]सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असे अनेकांचा तर्क आहे.[2][3] येथे मध्य अश्मयुगापासून ऐतिहासिक कालापर्यंतचे पुरातत्वीय अवशेष आढळतात. यातील सर्वात पुरातन चित्रे दहा हजार वर्षांपूर्वीची असून त्यांच्यात वेगवेगळे पशु आणि शिकार दर्शवली गेली आहे सगळ्यात अलीकडच्या अवशेषांत ऐतिहासिक कालातील घोडदळाचे चित्र आहे. या अवशेषांची साहजिकच स्थानिक आदिवासी समाजाला माहिती होती. ह्या माहितीच्या आधारावर किंकेड नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने 1888 साली शोध निबंध प्रकाशित करून हे बौद्धांचे स्थळ आहे असा उल्लेख केला होता. परंतु या अवशेषांचा व्यवस्थित अभ्यास करण्याचे श्रेय श्री वाकणकर या पुरातत्व तज्ञाला आहे.