भावना बलसावर
From Wikipedia, the free encyclopedia
भावना बलसावर (जन्म: २१ऑक्टोबर, १९७५) एक भारतीय चित्रपट, रंगमंच आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे. भावना ही भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटेची मुलगी आहे.
जलद तथ्य भावना बलसावर, जन्म ...
भावना बलसावर | |
---|---|
भावना बलसावर आणि शुभा खोटे | |
जन्म |
भावना बलसावर २१ ऑक्टोबर, १९७५ (1975-10-21) (वय: ४८) मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | १९९३ ते अद्याप |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | देख भाई देख |
आई | शुभा खोटे |
पती | करण शाह (२००२) |
बंद करा
भावना बलसावरला दोन भावंडे आहेत, त्यापैकी अश्विन बलसावार ही एक ध्वनी मुद्रक आहे.[1]
भावना 'आर्य विद्या मंदिर'ची माजी विद्यार्थीनी असून इयत्ता दहावी मध्ये आय.सी.एस.ई तुन अव्वल आलेली आहे.[2] भावना एस.एन.डी.टी. कॉलेजमधून ड्रेस डिझायनिंग आणि फॅशन समन्वयाची पदवीधर आहे.
इ.स. २००२ मध्ये भावना ने अभिनेता करण शहाशी लग्न केले.[3][4] तिचे आजोबा नंदू खोटे हे रंगमंच आणि मूक सिनेमातील एक प्रसिद्ध अभिनेते होते. नंदू खोटेच्या मेव्हणी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री दुर्गा खोटे ह्या होत्या. विनोदी अभिनेता आणि चरित्र नायक विजू खोटे भावना खोटेचे मामा आहेत.