![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4f/Bucharest.jpg/640px-Bucharest.jpg&w=640&q=50)
बुखारेस्ट
From Wikipedia, the free encyclopedia
बुखारेस्ट (रोमेनियन: București; उच्चार ) ही रोमेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर वसलेले बुखारेस्ट रोमेनियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे.
जलद तथ्य
बुखारेस्ट Bucureşti |
|||
रोमेनिया देशाची राजधानी | |||
![]() |
|||
|
|||
गुणक: 44°25′57″N 26°06′14″E |
|||
देश | ![]() |
||
स्थापना वर्ष | इ.स. १४५९ | ||
क्षेत्रफळ | २२८ चौ. किमी (८८ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासून उंची | कमाल २९५ फूट (९० मी) किमान १९७ फूट (६० मी) |
||
लोकसंख्या (१ जुलै २०१०) | |||
- शहर | १९,४२,२५४[1][2][3] | ||
- घनता | ८,५१० /चौ. किमी (२२,००० /चौ. मैल) | ||
- महानगर | २१,९२,३७२ | ||
प्रमाणवेळ | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.pmb.ro |
बंद करा
१ जुलै २०१० रोजी बुखारेस्ट शहराची लोकसंख्या १९,४२,२५४ इतकी होती.[1] बुखारेस्ट महानगर परिसरात सुमारे २२ लाख लोक राहतात.[2][3] ह्या बाबतीत युरोपियन संघामध्ये बुखरेस्टचा सहावा क्रमांक लागतो. येथील उल्लेखनीय वास्तू व कलेसाठी बुखारेस्टला लहान पॅरिस (Micul Paris) किंवा पूर्वेकडील पॅरिस ह्या टोपणनावांनी ओळखले जाते.[4]