![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/24/BadruddinTyabji.jpg/640px-BadruddinTyabji.jpg&w=640&q=50)
बद्रुद्दीन तय्यबजी
इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेले पहिले भारतीय / From Wikipedia, the free encyclopedia
बद्रुद्दीन तय्यबजी (१० ऑक्टोबर, इ.स. १८४४ – १८ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे ब्रिटिश राजवटीतील एक भारतीय वकील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि राजकारणी होते. इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेले ते पहिले भारतीय होते.[1] ते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष होते.[2]
जलद तथ्य बद्रुद्दीन तय्यबजी, जन्म: ...
बद्रुद्दीन तय्यबजी | |
---|---|
![]() | |
जन्म: | १० ऑक्टोबर, इ.स. १८४४ मुंबई, मुंबई इलाखा, ब्रिटिश भारत |
मृत्यू: | १८ नोव्हेंबर, इ.स. १९३९ लंडन, युनायटेड किंग्डम |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्य चळवळ |
शिक्षण: | बॅरिस्टर |
अवगत भाषा: | हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, उर्दू, फार्सी, अरबी |
कार्यक्षेत्र: | कायदा, स्वातंत्र्य चळवळ |
धर्म: | इस्लाम |
वडील: | तय्यब अली भाईमिया |
आई: | अमीना |
पत्नी: | रहत–उन–नफ्स |
बंद करा