बंगाली भाषा
भारत व बांगलादेश मधील एक प्रमुख भाषा / From Wikipedia, the free encyclopedia
बंगाली (बंगाली लिपीत: বাংলা ভাষা; लिप्यंतरण: बांला भाषा) ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आणि बांग्लादेशात बोलली जाणारी भाषा आहे. संस्कृत, पाली व प्राकृत या भाषांमधून बंगाली भाषेचा जन्म झाला. बंगाली बंगाल नामक प्रदेशात बोलली जाणारी भाषा असून, या प्रदेशात सध्याचा बांग्लादेश व भारतातील पश्चिम बंगाल राज्य यांचा समावेश होतो. बंगाली भाषिकांची एकूण संख्या २३ कोटीच्या आसपास असून, जगातील सर्वाधिक प्रचलित भाषांमध्ये मोडते.[1] (भाषिक संख्येनुसार जगभरात पाचवी). बंगाली बांग्लादेशातील प्रमुख भाषा असून भाषिक संख्येत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. बंगाली व आसामी भाषा भाषा इंडो-इराणी भाषाकुळातील भौगोलिकदृष्ट्या सर्वांत पूर्वेकडच्या भाषा आहेत.
हा लेख बंगाली भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बंगाली.
जलद तथ्य बंगाली, स्थानिक वापर ...
बंगाली | |
---|---|
বাংলা (बांग्ला) | |
स्थानिक वापर | भारत, बांगलादेश |
प्रदेश | बंगाल, ईशान्य भारत, आसाम काही प्रमाणात- म्यानमार, ओडिशा |
लोकसंख्या | २३ कोटी २० लक्ष (अनुमान) |
क्रम | ५ |
लिपी | पूर्व नागरी लिपी, |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
बांगलादेश भारत राज्यभाषा- पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, अंदमान आणि निकोबार |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | bn |
ISO ६३९-२ | ben |
ISO ६३९-३ | ben (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
बंद करा