फ्रेंच गयाना
From Wikipedia, the free encyclopedia
फ्रेंच गयाना (फ्रेंच: Guyane) हा दक्षिण अमेरिका खंडातील फ्रान्स देशाचा एक प्रदेश व विभाग आहे. गयानाच्या पूर्वेला व दक्षिणेला ब्राझिल, पश्चिमेला सुरिनाम तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहेत. कायेन ही फ्रेंच गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...
फ्रेंच गयाना Guyane française | |||||
| |||||
फ्रेंच गयानाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | कायेन | ||||
अधिकृत भाषा | फ्रेंच | ||||
- राष्ट्रप्रमुख | निकोलस सरकोजी | ||||
- पंतप्रधान | फ्रांकोइस फीलोन | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ८३,५३४ किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | २,२४,४६९ | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | २.७/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | युरो | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी - ३:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | GF | ||||
आंतरजाल प्रत्यय | .gf | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५९४ | ||||
बंद करा
इ.स. १७६३ साली फ्रेंच शोधक पोचण्याआधी येथे स्थानिक लोकांचे वास्तव्य होते. १८०९ साली पोर्तुगीज साम्राज्याने ह्या भागावर ताबा मिळवला परंतु १८१४ मधील पॅरिस येथे झालेल्या तहानंतर हा भूभाग पुन्हा फ्रेंचांच्या स्वाधीन करण्यात आला.
फ्रान्सचा सार्वभौम प्रदेश असल्यामुळे फ्रेंच गयाना युरोपियन संघ व युरोक्षेत्राचा भाग आहे व येथील चलन युरो हेच आहे. सध्या गयाना अंतराळ केंद्र हे फ्रान्स व युरोपाचे प्रमुख केंद्र हा फ्रेंच गयानाच्या मिळकतीचा मोठा स्रोत आहे.