![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/2f/Porfirio_Diaz_civilian.jpg/640px-Porfirio_Diaz_civilian.jpg&w=640&q=50)
पोर्फिरियो दियाझ
From Wikipedia, the free encyclopedia
होजे देला क्रुझ पोर्फिरियो दियाझ मोरी (स्पॅनिश: José de la Cruz Porfirio Díaz Mori; १५ सप्टेंबर १८३० - २ जुलै १९१५) हा मेक्सिको देशाचा लष्करी अधिकारी व तीन वेळा राष्ट्राध्यक्ष होता. १८६२ मधील फ्रान्सच्या मेक्सिकोवरील लष्करी आक्रमणादरम्यान मेक्सिकोकडून लढणाऱ्या दियाझने १८७६ सालच्या लष्करी बंडादरम्यान सत्ता बळकावली.
जलद तथ्य मागील, पुढील ...
पोर्फिरियो दियाझ | |
![]() | |
कार्यकाळ २८ नोव्हेंबर १८७६ – ६ डिसेंबर १८७६ | |
मागील | होजे मारिया इग्लेसियास |
---|---|
पुढील | हुआन मेंदेझ |
कार्यकाळ १७ फेब्रुवारी १८७७ – १ डिसेंबर १८८० | |
मागील | हुआन मेंदेझ |
पुढील | मनुएल गोन्झालेस |
कार्यकाळ १ डिसेंबर १८८४ – २५ मे १९११ | |
मागील | मनुएल गोन्झालेस |
पुढील | फ्रांसिस्को लेओं |
जन्म | १५ सप्टेंबर १८३० (1830-09-15) वाशाका दे हुआरेझ, वाशाका, मेक्सिको |
मृत्यू | २ जुलै, १९१५ (वय ८४) पॅरिस, फ्रान्स |
धर्म | रोमन कॅथलिक |
बंद करा
आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये दियाझने मेक्सिकोमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या तसेच देशाची आर्थिक प्रगती केली. परंतु त्याने हुकुमशहाच्या थाटात सत्ता चालवल्याचे मानले जाते.