From Wikipedia, the free encyclopedia
पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना पृष्ठवंशी असे म्हणतात. पाठीचा कणा हा हाडांच्या स्वरूपात असू शकतो किंवा कार्टिलेजच्या स्वरूपात असतो. ५ प्रमुख प्रकारचे जीव हे पृष्ठवंशी प्रकारात मोडतात
पृष्ठवंशी Early Cambrian - Recent | ||||||
---|---|---|---|---|---|---|
Blotched Blue-tongued Lizard, Tiliqua nigrolutea | ||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||
| ||||||
Classes and Clades | ||||||
See below | ||||||
हे जीव पूर्णतः पाण्यात जगणारे आहेत. ते पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूवर श्वसन करतात. बाह्य त्वचा ही खवल्यांनी सुरक्षित असते.
हे जीव पाण्यात व जमीनीवर जगू शकतात. पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूने श्वसन प्रकिया चालते तर पाण्याबाहेर ओल्या त्वचेतून श्वसन करतात. हे जीव कितीही जमीनीवर राहिले तरी प्रजोत्पादनासाठी पाण्यातच जावे लागते.
साप, कासवे, मगरी, सरडे इत्यादी - हे जीव जमीनीवर अथवा पाण्यामध्ये वास्तव्य करून असतात परंतु पाण्याबाहेर श्वसनाची प्रणाली पूर्णपणे विकसीत असते. यांना पाण्याच्या आत श्वसन करता येत नाही. श्वसनासाठी पाण्यावर यावेच लागते. तसेच पूर्णतः जमीनीवर देखील रहातात. त्वचा ही खवल्यांची असते. हृदयात कप्पे नसल्याने हे थंड रक्ताचे आहेत. प्रजोत्पादन हे जमीनीवरच होते. नवे जीव अंड्यात तयार होतात.
हे जीव प्रामुख्याने त्यांच्या उडण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक उडणारा जीव पक्षी असतो किंवा प्रत्येक पक्षी उडू शकतो असेही नाही. पक्षी हे त्यांच्या त्वचेवरून ओळखले जातात जी पिसांनी झाकलेली असते. हे जमीनीवरचे जीव आहेत व हवेतील प्राणवायू वर जगतात. प्रजोत्पादन हे जमीनीवरच होते व अंड्यांमध्ये नवे जीव जन्माला येतात. त्यांच्या हृदयात कप्पे असल्याने हे गरम रक्ताचे जीव आहेत.
पहा सस्तन प्राणी
उंदीर, हरीण, वाघ, मांजर, माकड, माणूस इत्यादी - या जीवांची तीन मुख्य वैशिष्ठ्ये आहेत. पहिले म्हणजे त्वचा ज्यावर केस असतात व दुसरे म्हणजे स्तन ज्याद्वारे हे प्राणी नवीन जन्मलेल्या पिल्लांसाठी दूध निर्माण करतात व तिसरे सर्वात महत्त्वाचे वैशिठ्य म्हणजे हे पिल्लांना आपल्या उदरातील खास जागेत म्हणजे गर्भाशयात वाढवून जन्म देतात. तसेच हे हृदयात कप्पे असलेले गरम रक्ताचे जीव आहेत व पूर्णतः हवेतील प्राणवायूवर जगणारे आहेत. जीव विविध वातावरणात परिस्थितीत जगण्यास सरावले आहेत. उदा: वटवाघळे ही उडू शकतात. देवमासे व डॉल्फिन हे पाण्यात आपले जीवन व्यतीत करू शकतात. इत्यादी
Seamless Wikipedia browsing. On steroids.