पुणे जंक्शन रेल्वे स्थानक
पुणे शहरामधील रेल्वे स्थानक / From Wikipedia, the free encyclopedia
पुणे जंक्शन किंवा पुणे रेल्वे स्थानक हे पुणे शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक पुणे शहराला भारतातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांशी जोडते. 'मुंबई-पुणे-सोलापूर-गुलबर्गामार्गे चेन्नई' आणि 'पुणे-मिरज-हुबळीमार्गे बंगळूर' हे दोन लोहमार्ग पुणे शहराशी जोडलेले आहेत. उपरोक्त दोन्ही लोहमार्गावरून जाणाऱ्या सर्व 'मेल-एक्स्प्रेस-जलद-संपर्कक्रांती' इत्यादी गाड्या पुणे स्थानकात थांबतात.
पुणे मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
महात्मा गांधी स्मारक प्रवेशद्वार | |
स्थानक तपशील | |
पत्ता | आगा खान रोड, पुणे - ४३१००१, पुणे जिल्हा |
गुणक | 18°31′44″N 73°52′21″E |
मार्ग |
मुंबई-चेन्नई मार्ग पुणे-बंगळूर मार्ग |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
उद्घाटन | २७ जुलै १९२५ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | PUNE |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
सेवा | |
पुणे उपनगरी रेल्वे | |
स्थान | |
|
१९३० च्या दशकात सुरू झालेली 'पुणे-मुंबई डेक्कन क्वीन' ही तत्कालीन भारतातील सर्वांत वेगवान एक्स्प्रेस मानली जात असे, त्या काळी डेक्कन क्वीन 'पुणे-मुंबई' हे अंतर केवळ अडीच तासांत (सध्या साडेतीन तास) पूर्ण करत असे. या स्वातंत्र्यपूर्व काळापासून अव्याहत चालणाऱ्या वेगवान एक्स्प्रेसचा वाढदिवस प्रतिवर्षी १ जूनला या स्थानकात साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय स्तराची स्थानके बनविण्यासाठी भारतातील ज्या प्रमुख स्थानकांची निवड झाली त्यात 'पुणे जंक्शन' समाविष्ट करण्यात आले आहे.