पालखेडची लढाई
From Wikipedia, the free encyclopedia
पालखेडची लढाई फेब्रुवारी २८, १७२८ रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहराजवळ असलेल्या पालखेड येथील लढाई होती.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
पालखेडची लढाई
दिनांक | फेब्रुवारी २८, इ.स. १७२८ |
---|---|
स्थान | पालखेड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा |
परिणती | मराठ्यांचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
मराठा साम्राज्य | हैदराबादचा निजाम |
सेनापती | |
बाजीराव पहिला | निझाम-उल-मुल्क
|
बंद करा
पहिल्या बाजीरावांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य व हैदराबादचा निझाम यांच्यातील या लढाईत मराठ्यांचा जय झाला. या लढाईत दोन्ही सैन्यांची फारशी खराबी झाली नाही. बाजीरावांनी निझामाला खेळवत स्वतःला अनुकूल अशा ठिकाणी खेचून आणले व तेथे कोंडीत पकडून निझामाला हरवले. हे बाजीरावांच्या व्यूहरचनेचे व युद्धतंत्राचे उत्तम उदाहरण समजले जाते. पालखेडच्या लढाईला अनेक युद्धशास्त्र अभ्यासकांनी गनिमी काव्याचे अत्युत्तम उदाहरण मानलेले आहे.[1][2][3]