पाइक्स पीक
From Wikipedia, the free encyclopedia
पाइक्स पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेतील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या इतर रांगांपेक्षा किंचित दूर असलेले हे शिखर पाइक्स पीक मासिफ या डोंगरावर आहे. कॉलोराडो स्प्रिंग्ज शहराजवळ असलेल्या या शिखराची उंची १४,२७६ फूट आहे. या शिखरापर्यंत चालत, रेल्वेगाडीने किंवा मोटारकारने जाता येते.
जलद तथ्य पाइक्स पीक ...
पाइक्स पीक | |
---|---|
पाइक्स पीक | |
१४,११५ फूट (४,३०२ मीटर) | |
एल पासो काउंटी, कॉलोराडो, अमेरिका | |
पाइक्स पीक मासिफ | |
38°40′25″N 106°14′46″E | |
बार ट्रेल, पाइक्स पीक कॉग रेल्वे, खाजगी वाहने |
बंद करा
स्पॅनिश शोधकांनी याला सुरुवातीस एल कॅपितान असे नाव दिले होते. त्यानंतर झेब्युलॉन पाइकचे नाव या डोंगरास दिले गेले. या डोंगराला स्थानिक अरापाहो भाषेत हीय ओतोयू असे नाव आहे.[1]