निकोलस विंटन
From Wikipedia, the free encyclopedia
सर निकोलस जॉर्ज विंटन (१९ मे, १९०९ - १ जुलै, २०१५) एक ब्रिटिश समाज सेवक, शेरदलाल आणि रेड क्रॉसचे अधिकारी होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाआधी नाझी जर्मनी आणि जर्मनीच्या आधिपत्याखाली असलेल्या प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या ज्यूंच्या शिरकाणातून शेकडो ज्यू मुलांची सुटका करण्यात मदत केली.चेकोस्लोव्हाकियामधील ही ६६९ मुले बव्हंशी ज्यू होती.
महायुद्ध सुरू होण्याआधी विंटन चेकोस्लोव्हाकियामध्ये गेले होते तेव्हा त्यांनी तेथील ज्यू मुले मृत्युमुखी पाठविण्यात असलेली पाहिली व त्यांपैकी ज्यांना वाचवता येईल अशांची यादी त्यांनी तयार करण्यास मदत केली. ब्रिटनला परतल्यावर विंटन यांनी या मुलांना तेथे आणण्यासाठीची कायदेशीर व्यवस्था तसेच त्यांना राहण्यासाठी घरे आणि दत्तक पालकांचा शोध घेतला. ही मुले ब्रिटनमध्ये आल्यावर विंटन यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था लावून दिली.[1]
विंटननी केलेले हे काम बव्हंशी पडद्याआडच राहिले. १९८८मध्ये बीबीसीने दॅट्स लाइफ या कार्यक्रमातून विंटन आणि त्यांनी सोडविलेल्या मुलांपैकी १२-१४ मुलांशी अनपेक्षित गाठ घालून दिली. ही गाठ देशभर प्रसिद्ध झाली आणि ब्रिटिश नियतकालिकांनी विंटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले काम उचलून धरले. त्यांना ब्रिटिश शिंडलर असे टोपणनाव मिळाले.[2] २००३मध्ये राणी एलिझाबेथने त्यांना या कामासाठी नाइटहूड दिले.[3] २८ ऑक्टोबर २०१४ रोजी चेक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष मिलोस झेमन यांना ऑर्डर ऑफ व्हाइट लायन हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला.
१ जुलै, २००६ रोजी वयाच्या १०६व्या वर्षी विंटन यांचे निधन झाले. [4]