धूम्रपान
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
सर्व साधारणपणे धुम्रपान म्हणजे धूर आत ओढणे असा होतो. सध्या धुम्रपान करण्यासाठी अनेक पदार्थांचा वापर केला जातो, उदा. तंबाकू, अफिम आणि इतर नशा देणाऱ्या पदार्थाचा ही वापर केला जातो.आज धुम्रपान करण्यासाठी सिगारेट, चिलीम (गांजा), बिडी, पाईप, हुक्का या पद्धतीचा वापर केला जातो.नाश करण्यासाठी धुम्रपान केले जाते. हे कधी फॅशन, कधी मज्जा, कधी टेन्शन आहे म्हणून तर कधी मित्रांसोबत अनेक जन धुम्रपान करत असतात. धुम्रपान केल्याने त्या व्यक्तीस थोडेसे उत्तेजित किंवा आनंदी झाल्यासारखे वाटते. याचामागील शास्त्रीय कारण असे की तंबाखू मधील निकोटीन हा पदार्थ आपल्या शरीरातील डोपामिन वाढवतो यामुळे धुम्रपान करणारी व्यक्ती आनंदी आणि उत्साही होते.पुरुषा प्रमाणेच महिलाही धूम्रपान करत असतात.
२००१ मध्ये, मुरली देवडा यांनी सर्वोच्च न्यायालयातील एक ऐतिहासिक खटला जिंकला ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली गेली. त्या वेळी वैधानिक तरतुदी नसताना, न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी जसे की सभागृह, रुग्णालयाच्या इमारती, आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, न्यायालयीन इमारती, सार्वजनिक कार्यालये आणि रेल्वेसह सार्वजनिक वाहने या ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई केली.[1]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.