दीनानाथ मंगेशकर
मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार / From Wikipedia, the free encyclopedia
दीनानाथ मंगेशकर (डिसेंबर २९, इ.स. १९०० - एप्रिल २४, इ.स. १९४२) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले.
दीनानाथ मंगेशकर | |
---|---|
दीनानाथ मंगेशकर | |
आयुष्य | |
जन्म | डिसेंबर २९, इ.स. १९०० |
जन्म स्थान | गोवा, पोर्तुगीज भारत |
मृत्यू | एप्रिल २४, इ.स. १९४२ |
मृत्यू स्थान | ससून रुग्णालय, पुणे, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत |
पारिवारिक माहिती | |
आई | येसूबाई राणे |
वडील | गणेश भिकोबाभट नवाथे (अभिषेकी) |
जोडीदार | माई मंगेशकर (पूर्वाश्रमीचे नाव: शेवंती लाड) |
अपत्ये | लता मंगेशकर, मीना मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर |
संगीत साधना | |
गुरू | बाबा माशेलकर, रामकृष्णबुवा वझे |
गायन प्रकार | हिंदुस्तानी गायन, नाट्यसंगीत |
संगीत कारकीर्द | |
कार्य | बलवंत संगीत नाटक मंडळीची स्थापना, बलवंत पिक्चर्स |
कार्यक्षेत्र | संगीत, अभिनय |
पंडित दिनानाथ मंगेशकर, ह्यांचा जन्म गोव्यातील मंगेशी , Mangeshi, गोवा.जन्म तारिक २९ डिसेंबर १९०० .[1] त्यांच्या वडिलांचं नाव गणेश भट (भिकामभट्ट) नावथे हर्डीकर (अभिषेकी) एक लग्न झालेले कऱ्हाडे ब्राह्मण होते[2]:47 जे मंगेशीतील देवळात पूजारी होते भट,पूजारी Mangeshi Temple जे गोव्यात आहे. त्यांच्या आई येसूबाई राणे ह्या होत्या[2] ज्या गणेश भटांच्या प्रेमिका mistress[1] त्या गोव्यातील कलावंत समाजातील होत्या, Devadasi community[3] , ज्याला आज Gomantak Maratha Samaj[4] म्हटलं जातं.जन्म मंगेशी गावातील मंगेशी गाव असल्याने, त्यांनी आपल्या तरुणाईत "मंगेशकर" हे नाव धारण केले, ज्याचा अर्थ ते "मंगेशी गांवचे". मंगेश हे गावातील देवाचे म्हणजेच महादेवाचे नाव असल्याने,गावाचेही नाव मंगेशी Mangeshi Temple.[5][3]
देवदासी असल्याने,येसूबाई ह्या नावाजलेल्या गायिका होत्या.[6] पंडित दिनानाथांच्या वडिलांचं मुळ आडनाव हर्डिकर होतं,त्यांच्या वडिलांचं नियमित अभिषेक वाहण्याचं काम होतं (ritual bathing). ते नित्य मंगेशी देवस्थानात भटजी म्हणून सेवा करायचे,म्हणून त्यांचे नाव अभिषेकी म्हणूनही प्रख्यात झाले.[2]:{{{1}}}
त्यांचेच नातू हे व कायदेशीर मूलाचे बळवंतराव सुपूत्र भारतीय गायकी जितेंद्र अभिषेकी होते, जे दिनानाथांच्या सावत्र भावाचे सुपूत्र होते.