दालन:इतिहास/इतिहासकार/2
From Wikipedia, the free encyclopedia
लेओपोल्ड फॉन रांक (मराठी लेखनभेद: लेओपोल्ड फॉन रांके; जर्मन: Leopold von Ranke) (डिसेंबर २१, इ.स. १७९५; वीह, थ्युरिंगेन, जर्मनी - मे २३, इ.स. १८८६; बेर्लिन, जर्मनी) हा जर्मन इतिहासकार होता.
याचे शिक्षण हाले व बर्लिन येथे झाले. इ.स. १८१८ साली त्याने फ्रांकफुर्ट येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. त्यानंतर इ.स. १८२५ साली रांकप्रशियन शासनाच्या सेवेत दाखल झाला. त्याचवेळी त्याची बर्लिन येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नेबूरचा रोमन इतिहास वाचल्यानंतर उत्सुकता व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी रांक याने हिरोडोटस, थुसिडाडस, झेनोफीन, डायनोसिस, लिव्ही, सिसिरो या इतिहासकारांचे साहित्य अभ्यासले.
इ.स.च्या १९व्या शतकातील शास्त्रशुद्ध इतिहास संशोधन व इतिहास लेखन याचा इतिहास/इतिहासकार/2 प्रणेता आहे. त्याने इतिहासाला बुद्धिवादी विषय बनवून व्यावसायिक प्रशिक्षण व पुराभिलेख संशोधन कार्यपद्धतीची जोड दिली. शास्त्रोक्त संशोधन करून व पुराव्यांची काटेकोर छानणी करूनच त्यावर इतिहास लेखन करण्याचा नवा पायंडा त्याने पाडला.