होजे दानियेल ओर्तेगा साव्हेद्रा (स्पॅनिश: José Daniel Ortega Saavedra; ११ नोव्हेंबर १९४५) हा निकाराग्वा देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २००७ पासून राष्ट्राध्यक्ष असणारा ओर्तेगा ह्यापूर्वी १९८५ ते १९९० दरम्यान देखील राष्ट्राध्यक्षपदावर होता.

जलद तथ्य मागील, पुढील ...
दानियेल ओर्तेगा
Thumb

निकाराग्वा ध्वज निकाराग्वाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१० जानेवारी २००७
मागील एन्रिके बोलान्योस
कार्यकाळ
१० जानेवारी १९८५  २५ एप्रिल १९९०
मागील स्वतः
पुढील व्हायोलेटा चमोरो

जन्म ११ नोव्हेंबर, १९४५ (1945-11-11) (वय: ७८)
ला लिबर्ताद, निकाराग्वा
राजकीय पक्ष सान्दिनिस्ता राष्ट्रीय मुक्ती मोर्चा
धर्म रोमन कॅथलिक
बंद करा

अनास्तासियो सोमोझा देबेलच्या हुकुमशाही विरुद्ध बंड पुकारणाऱ्या ओर्तेगाने क्युबामधील फिडेल कॅस्ट्रोच्या सरकारकडून सशस्त्र गनिमी काव्याचे प्रशिक्षण घेतले. १९७९ सालच्या निकाराग्वातील क्रांतीदरम्यान देबेलची सत्ता उलथवून ओर्तेगाने देशाचे नेतृत्व हाती घेतले. ओर्तेगाची समाजवादी धोरणे अमान्य असणाऱ्या अमेरिकेने रॉनल्ड रेगनच्या नेतृत्वाखाली त्याच्या विरोधकांना शस्त्रे व मदत पुरवली ज्यामुळे निकाराग्वामध्ये हिंसक गृहयुद्ध झाले.

१९९० मधील अध्यक्षीय निवडणुक हरल्यानंतर देखील ओर्तेगा निकाराग्वाच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिला. २००६ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून तो पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदावर आला.

सुप्रीम इलेक्टोरल कौन्सिलने जाहीर केलेल्या पहिल्या आंशिक अधिकृत निकालांनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये, डॅनियल ओर्टेगा, ७५% मतांसह चौथ्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडून आले.

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.