तुपोलेव टीयू-१५४
From Wikipedia, the free encyclopedia
तुपोलेव टीयू-१५४ (रशियन: Туполев Ту-154) हे रशियाच्या तुपोलेव कंपनीने बनवलेले एक अरुंद रचनेचे जेट विमान आहे. तीन इंजिने असलेले हे विमान १९६० च्या दशकात विकसित करण्यात आले. सोव्हिएत संघ काळात सर्वाधिक वापरले गेलेल्या ह्या विमानाद्वारे एरोफ्लोत ह्या राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनीने १९९० साली १३.७५ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. तुपोलेव तू-१५४चा साधारण वेग ९७५ किमी प्रति तास (६०६ मैल/तास) इतका तर क्षमता ५,२८० किलोमीटर (३,२८० मैल) इतकी असून ते सर्वाधिक वेगवान प्रवासी विमानांपैकी एक मानले जाते. रशियाखेरीज १७ इतर राष्ट्रांमध्ये देखील हे विमान वापरले गेले. डांबरीकरण नसलेल्या अथवा खडी टाकून बनवण्यात आलेल्या धावपट्टीवर देखील हे विमान काम करू शकत असे.
तुपोलेव टीयू-१५४ | |
---|---|
मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे उझबेकिस्तान एअरवेजचे तुपोलेव तू-१५४एम विमान | |
प्रकार | मध्यम पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे जेट विमान |
उत्पादक देश | सोव्हिएत संघ/रशिया |
उत्पादक | तुपोलेव |
पहिले उड्डाण | ८ ऑक्टोबर १९६८ |
समावेश | ७ फेब्रुवारी १९७२ (एरोफ्लोत) |
सद्यस्थिती | मर्यादित सेवेत |
मुख्य उपभोक्ता | रशियन हवाई दल |
उत्पादन काळ | १९६८-२०१३ |
उत्पादित संख्या | १,०२६ |
२०१० मध्ये एरोफ्लोतने तुपोलेव तू-१५४ विमाने आपल्या ताफ्यातून निवृत्त करण्याची घोषणा केली. तुपोलेव तू-१५४ विमानाचा अखेरचा प्रवास ३१ डिसेंबर २००९ रोजी येकातेरिनबुर्ग ते मॉस्को ह्या एरोफ्लोत फ्लाईट ७३६ द्वारे घडला.