![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/f/f5/USA_Texas_location_map.svg/langmr-640px-USA_Texas_location_map.svg.png&w=640&q=50)
डॅलस
From Wikipedia, the free encyclopedia
डॅलस हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे व अमेरिकेमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुमारे ११.९८ लाख लोकसंख्या असलेले हे शहर ६४.७७ लाख वस्तीच्या व अमेरिकेमधील चौथ्या क्रमांकाच्या डॅलस-फोर्ट वर्थ महानगरामधील प्रमुख शहर आहे.[1][2][3] ३७४ अब्ज डॉलर इतकी उलाढाल असलेली डॅलसची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.[4]
जलद तथ्य
डॅलस Dallas |
|||
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर | |||
|
|||
गुणक: 32°46′58″N 96°48′14″W |
|||
देश | ![]() |
||
राज्य | टेक्सास | ||
स्थापना वर्ष | फेब्रुवारी २, इ.स. १८५६ | ||
क्षेत्रफळ | ९९७.१ चौ. किमी (३८५.० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४३० फूट (१३० मी) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | ११,९७,८१६ | ||
- घनता | १,४२७.४ /चौ. किमी (३,६९७ /चौ. मैल) | ||
- महानगर | ६४,७७,३१५ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० | ||
www.dallascityhall.com |
बंद करा
डल्लेस आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्याशी गल्लत करू नका.
टेक्सासच्या ईशान्य भागात इ.स. १८४१ साली स्थापन झालेले डॅलस शहर खनिज तेल व कापसाचे मोठे व्यापार व वाहतूक केंद्र म्हणून वर आले. सध्या बँकिंग, दूरध्वनी, उर्जा, आरोग्यसेवा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी वैविध्यपूर्ण उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र असलेले डॅलस एक जागतिक शहर आहे.