From Wikipedia, the free encyclopedia
डीसी कॉमिक्स, इंक. ही एक अमेरिकन कॉमिक पुस्तकांची प्रकाशन कंपनी आहे. ही कंपनी डीसी एन्टरटेनमेंटचा प्रकाशन विभाग आहे, [२][३] डीसी कॉमिक्स वॉर्नर ब्रदर्स ग्लोबल ब्रँड अँड एक्सपीरियन्सची उपकंपनी आहे. डीसी कॉमिक्स ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी अमेरिकन कॉमिक बुक कंपन्यांपैकी एक आहे. डीसी विश्वातील अनेक काल्पनिक व्यक्तिरेखा, खासकरून सुपरमॅन, बॅटमॅन आणि वंडर वूमन सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या विश्वात लेक्स लूथर, जोकर, कॅटवुमन आणि पेंग्विन सारखे खलनायक देखील आहेत. कंपनीने डीसी विश्वाशी निगडीत नसलेली प्रकाशने सुद्धा केली आहे, यात वॉचमेन, व्ही फॉर व्हेंडेटा, फॅबल्स, इ.चा समावेश आहे..
![]() डीसी कॉमिक्स वर्तमान लोगो, २०१६ मध्ये त्याच्या डीसी पुनर्जन्म कॉमिक लाइनच्या प्रारंभासह सादर केला गेला होता | |
मूळ कंपनी |
डीसी एंटरटेनमेंट (वॉर्नर ब्रदर्स) |
---|---|
स्थिती | सक्रिय |
स्थापना केली | जून 25, 1934 [१] (नॅशनल अलाईड पब्लिकेशन या नावाने) |
संस्थापक | मॅल्कम व्हीलर-निकल्सन |
उत्पत्तीचा देश | अमेरिका |
मुख्यालयाचे स्थान | २९०० वेस्ट अलमेडा व्हेन्यू, बरबँक, कॅलिफोर्निया |
वितरण | पेंग्विन रॅंडम हाऊस पब्लिशर सर्व्हिसेस, डायमंड कॉमिक डिस्ट्रिब्यूटर्स |
मुख्य लोक |
|
शैली |
|
अधिकृत संकेतस्थळ |
www |
Seamless Wikipedia browsing. On steroids.