डायनोसॉर
From Wikipedia, the free encyclopedia
डायनोसॉर किंवा भिमकाय प्राणी हे इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे २३ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९,००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी; काही द्वीपादी होते तर काही चतुष्पाद. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणाऱ्या डायनोसॉरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते.
जलद तथ्य डायनोसॉर, प्रजातींची उपलब्धता ...
डायनोसॉर | ||||
---|---|---|---|---|
अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी मधील डायनोसॉरचा सापळा | ||||
प्रजातींची उपलब्धता | ||||
विलुप्त | ||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||
| ||||
बंद करा
सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी घडलेल्या एका मोठ्या विनाशचक्रा दरम्यान डायनोसॉरचा अस्त झाला.