From Wikipedia, the free encyclopedia
ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिसियाचा ४०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. ट्युनिस ही ट्युनिसियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
ट्युनिसिया الجمهوريةالتونسية République tunisienne ट्युनिसियाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: حرية، نظام، عدالة "स्वतंत्रता, सुव्यवस्था, न्याय"[1] | |||||
राष्ट्रगीत: हुमत अल-हिमा | |||||
ट्युनिसियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
ट्युनिस | ||||
अधिकृत भाषा | अरबी, फ्रेंच | ||||
- राष्ट्रप्रमुख | मोन्सेफ मार्झूकी | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- हुसेन घराणे | १५ जुलै १७०५ | ||||
- फ्रान्सपासून स्वातंत्र्य | २० मार्च १९५६ | ||||
- प्रजासत्ताक | २५ जुलै १९५७ | ||||
- ट्युनिसियन क्रांती | १४ जानेवारी २०११ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,६३,६१० किमी२ (९३वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १,०७,३२,९०० (७७वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ६३/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १००.९७९ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ९,४७७ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७१२ (उच्च) (९४ वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | ट्युनिसियन दिनार | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | TN | ||||
आंतरजाल प्रत्यय | .tn | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | २१६ | ||||
प्रागैतिहसिक काळात ह्या भागावर रोमनांची सत्ता होती. रोमन साम्राज्याने इ.स. पूर्व १४९ साली जवळजवळ सर्व भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता. सातव्या शतकादरम्यान माघरेबवर अरब मुस्लिम लोकांनी कब्जा मिळवला. येथील कैरूवान हे उत्तर आफ्रिकेमधील पहिले इस्लामिक शहर होते. १५३४ साली ओस्मानी साम्राज्याने सर्वप्रथम ट्युनिसियावर अधिपत्य मिळवले. पुढील ३००हून अधिक वर्षे ओस्मानी साम्राज्याचा भाग राहिल्यानंतर १८८१ साली फ्रान्सने ट्युनिसियावर आक्रमण करून येथे आपले मांडलिक राज्य स्थापन केले.
१९५६ साली ट्युनिसियाला स्वातंत्र्य मिळाले. हबीब बुरग्विबा हा ट्युनिशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. २०११ साली ट्युनिसियन जनतेने केलेल्या क्रांतीदरम्यान भ्रष्ट व लाचखोर राष्ट्राध्यक्ष झिने एल अबिदिन बेन अली ह्याची सत्ता उलथवून टाकली गेली व ट्युनिसियामध्ये लोकशाहीवादी सरकार स्थापन झाले.
ट्युनिसएअर एक्सप्रेस ही कंपनी ट्युनिसियामध्ये विमान वाहतूक पुरवते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.