![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e9/Johor_Bahru_city_in_2015.jpg/640px-Johor_Bahru_city_in_2015.jpg&w=640&q=50)
जोहोर बारू
From Wikipedia, the free encyclopedia
जोहोर बारू (मलय: Johor Bahru ; अर्थ: नवीन जवाहीर ;) हे मलेशियाच्या संघातील जोहोर या दक्षिणेकडील राज्याचे राजधानीचे शहर आहे. ते युरेशियन भूखंडावरील दक्षिणतम टोकास वसलेले शहर आहे. जोहोर बारू शहराची लोकसंख्या १३,७०,७३८ (इ.स. २००९), तर जोहोर बारू महानगरीय क्षेत्रातील लोकसंख्या सुमारे २०,००,००० असून संघीय राजधानी असलेले क्वालालंपूर व नजीकच्या क्लांग खोरे क्षेत्राच्या महानगराखालोखाल ते मलेशियातील दुसरे मोठे नागरी क्षेत्र आहे. जोहोर सामुद्रधुनीमुळे सिंगापुरापासून भौगोलिक दृष्ट्या विलग झालेले जोहोर बारू उद्योग, पर्यटन, वाणिज्य व दळणवळण या क्षेत्रांच्या पातळीवर बऱ्याचदा सिंगापुराचे जुळे शहर मानले जाते.
जलद तथ्य
जोहोर बारू Johor Bahru |
|
मलेशियामधील शहर | |
![]() |
|
गुणक: 1°29′00″N 103°44′00″E |
|
देश | ![]() |
राज्य | जोहोर |
स्थापना वर्ष | इ.स. १८५५ (वसवणूक) इ.स. १९९४ (शहर दर्जा बहाल) |
क्षेत्रफळ | १८५ चौ. किमी (७१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३६.८८ फूट (११.२४ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १३,७०,७३८ |
- घनता | ७,४०९ /चौ. किमी (१९,१९० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | मलेशियन प्रमाणवेळ (यूटीसी+८) |
http://www.johordt.gov.my/ |
बंद करा