![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bf/%25D0%259F%25D0%25B0%25D1%2580%25D0%25BE%25D1%2585%25D0%25BE%25D0%25B4_%25D0%25A7%25D0%25B5%25D0%25BB%25D1%258E%25D1%2581%25D0%25BA%25D0%25B8%25D0%25BD.jpg/640px-%25D0%259F%25D0%25B0%25D1%2580%25D0%25BE%25D1%2585%25D0%25BE%25D0%25B4_%25D0%25A7%25D0%25B5%25D0%25BB%25D1%258E%25D1%2581%25D0%25BA%25D0%25B8%25D0%25BD.jpg&w=640&q=50)
चेलियुस्किन
From Wikipedia, the free encyclopedia
चेलियुस्किन हे वाफेवर चालणारे रशियाचे जहाज होते.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bf/%D0%9F%D0%B0%D1%80%D0%BE%D1%85%D0%BE%D0%B4_%D0%A7%D0%B5%D0%BB%D1%8E%D1%81%D0%BA%D0%B8%D0%BD.jpg/640px-%D0%9F%D0%B0%D1%80%D0%BE%D1%85%D0%BE%D0%B4_%D0%A7%D0%B5%D0%BB%D1%8E%D1%81%D0%BA%D0%B8%D0%BD.jpg)
याची बांधणी डेन्मार्कमध्ये इ.स. १९३३ साली झाली व याला रशियाच्या ध्रुवीय शोधक सेमियोन इव्हानोविच चेलियुस्किनचे नाव दिले गेले.
इ.स. १९३४मध्ये उत्तर ध्रुवीय प्रदेशात असताना हे जहाज बर्फात अडकले व हे हिमनग जेथे जातील तेथे भरकटू लागले. शेवटी फेब्रुवारी १३ला बर्फाचा दाब वाढुन याचे तुकडे झाले. यातील खलाश्यांनी बर्फावरच आश्रय घेतला. २ महिन्यांनंतर जवळजवळ सगळ्यांना बर्फावर उतरणाऱ्या विमानाद्वारे वाचवण्यात आले.