घनगड
पुणे जिल्ह्यातील एक किल्ला / From Wikipedia, the free encyclopedia
घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. लोणावळ्यापासून भांबर्डे व त्यानंतर एकोले गाव लागते. या गावी घनगड किल्ला अगदी मध्यभागी आहे. चढायला फारसा अवघड नसणारा किल्ला मात्र देखणा आहे. या गडाचे प्रथम प्रवेशद्वार आजही अस्तित्व टिकून आहे. वाघजाईचे मंदिर पाण्याचे टाके िऱ्याने? जाणारी वाट ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. सदर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरीही गडमाथ्यावर आजही चिलखती बुरुज, काही वाड्याचे अवशेष, पाच-सहा पाण्याची टाकी आहेत. गडावरून सुधागड अप्रतिम दिसतो. तसेच दरीच्या पलीकडे तैलबैला ही सुंदर दिसतो.
जलद तथ्य
घनगड किल्ला | |
घनगड किल्ला | |
नाव | घनगड किल्ला |
उंची | ९६२ मीटर/३१५५ फूट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | अवघड |
ठिकाण | महाराष्ट्र |
जवळचे गाव | भांबर्डे |
डोंगररांग | घनगड रांग |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
बंद करा
शिवाजी ट्रेल्स नावाच्या दुर्ग संवर्धन संस्थेने या गडाची डागडुजी केली आहे.(सप्टेंबर २०१३)
कुटुंबासमवेत या किल्ल्यावर एक दिवस आरामशीर घालवू शकतो.