ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल कम्युनिकेशन
From Wikipedia, the free encyclopedia
जीएसएम (Global System for Mobile Communication किंवा GSM) मूळ (Groupe Spécial Mobile) : मोबाइल तंत्रज्ञानातील GSM ही सर्वात प्रसिद्ध असलेल्या दोन पद्धतींतली एक पद्धत आहे. मोबाइल तंत्रज्ञानात जागतिक पातळीवर जवळ जवळ ८०% हिस्सा या तंत्रज्ञानाचा आहे. ही पद्धत मुळात युरोपात सुरू झाली. सध्या जगातील २१२ देश या तंत्राचा वापर करतात. या तंत्रज्ञानामुळे कुठलाही जीएसएम वापरकर्ता कुठल्याही देशात रोमिंग करू शकतो. हे तंत्रज्ञान पूर्णपणे अंकीय संदेशवहन पद्धतीवर आधारित आहे. SMS या सेवेचे श्रेय जीएसएम या तंत्रज्ञानालाच जाते.जीएसएम TDMAचा वापर करतो.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |