पश्चिम आफ्रिकेतील एक देश From Wikipedia, the free encyclopedia
घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. घानाच्या पश्चिमेला कोट दि आईव्होर, उत्तरेला बर्किना फासो व पूर्वेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात आहे. आक्रा ही घानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. येथे स्वामी घनानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माची ध्वजा रोवली आणि मठ स्थापन केला आहे.
घाना Republic of Ghana घानाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: फ्रीडम ॲंड जस्टिस (स्वातंत्र्य आणि न्याय) | |||||
राष्ट्रगीत: गॉड ब्लेस अवर होमलॅंड घाना | |||||
घानाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
आक्रा | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | जॉन ड्रामानी महामा | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | मार्च ६, १९५७ (युनायटेड किंग्डमपासून) | ||||
- प्रजासत्ताक दिन | जुलै १, १९६० | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २,३८,५४० किमी२ (७९वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ३.५ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | २,४२,३३,४३१ (४९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १०१.५/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ८२.५७१ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ३,३१२ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.५४१ (मध्यम) (१३५ वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | घाना सेडी (GHC) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | ग्रीनविच प्रमाणवेळ (GMT) (यूटीसी ०) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | GH | ||||
आंतरजाल प्रत्यय | .gh | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +२३३ | ||||
१५ व्या शतकात युरोपीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थानिक जमातींचे राज्य होते. १८७४ साली ब्रिटिशांनी येथे वसाहत स्थापन केली व येथील सोन्याच्या मुबलक साठ्यांमुळे ह्याचे नाव गोल्ड कोस्ट असे ठेवले. गोल्ड कोस्टला १९५७ साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली.
सध्या घाना संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल परिषद, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. आफ्रिका खंडात सुवर्ण उत्पादनात दक्षिण आफ्रिकेखालोखाल घानाचा दुसरा क्रमांक लागतो. कोकोच्या उत्पादनात देखील घाना जगात अग्रेसर आहे.
घाना देश पश्चिम आफ्रिकेत अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. घानाच्या आग्नेय भागात व्होल्टा सरोवर हे जगातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर स्थित आहे.
प्रमुख धर्म ख्रिस्ती आहे. तरीही येथे स्वामी घनानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माचा मठ स्थापन केला आहे. येथे गणेशोत्सव ही साजरा केला जातो.
घानाचे चलन घानायन सेडी (GHS) आहे. एक सेडी १०० पेसोमध्ये विभागली जाते. घानायन सेडीचा वापर १९६७ मध्ये सुरू झाला. याआधी घाना ब्रिटिश पाउंड वापरत असे. घानाची अर्थव्यवस्था ही शेती, खाणकाम आणि सेवांवर आधारित मध्यम-उत्पन्न असलेली अर्थव्यवस्था आहे. घाना हा पश्चिम आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे आणि त्याची अर्थव्यवस्था २०२२ मध्ये २.९% वाढल्याचा अंदाज आहे.
कोको, कापूस, तांदूळ, मका आणि कसावा ही घानाच्या कृषी अर्थव्यवस्थेतील प्रमुख पिके आहेत. घाना हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोको उत्पादक देश आहे आणि कोको हे त्याचे प्रमुख निर्यात उत्पादन आहे. सोने, चांदी, बॉक्साईट आणि लोह ही घानाच्या खाण अर्थव्यवस्थेतील प्रमुख खनिजे आहेत. घाना हा जगातील तिसरा सर्वात मोठा सोन्याचा उत्पादक देश आहे.[ संदर्भ हवा ]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.