गूगल (किंवा गूगल इनकॉर्पोरेटेड) (इंग्लिश: Google, नॅसडॅकः GOOG) नावाची अमेरिकन कंपनी गूगल शोधयंत्र, ऑर्कुट, यूट्यूब, ॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते.

जलद तथ्य प्रकार, उद्योग क्षेत्र ...
गूगल इन्कॉर्पोरेटेड
प्रकार सार्वजनिक कंपनी
उद्योग क्षेत्र इंटरनेट, संगणक सॉफ्टवेर,
स्थापना सप्टेंबर ७, १९९८
मुख्यालय

कॅलीफोर्नीया, अमेरिका

कॅलीफोर्नीया
कार्यालयांची संख्या 29
महत्त्वाच्या व्यक्ती सुंदर पिचाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक
सर्जी ब्रिन, सहसंस्थापक, तंत्रज्ञान अध्यक्ष
लॅरी पेज, सहसंस्थापक, उत्पादन अध्यक्ष
महसूली उत्पन्न १०,६०४ अब्ज अमेरिकन डॉलर (२००६)
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
३,०७७ अब्ज अमेरिकन डॉलर (२००६)
कर्मचारी १,३९,९९५ (२०२१)
पालक कंपनी अल्फाबेट इन्कॉर्पोरेटेड
संकेतस्थळ www.google.com
बंद करा

गूगल कंपनी विशेषतः आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना लॅरी पेजसर्गेई ब्रिन यांनी ७ सप्टेंबर|१९९८ रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १० ऑगस्ट २०१५पासून सुंदर पिचाई यांची गूगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.

गूगल हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.

इंटरनेटवरील कोणतीही माहिती गूगल शोधून देऊ शकतो. गूगल हा एक लोकप्रिय ॲप आहे आणि लोक त्याचा जास्तीत जास्त वापर करतात.

गूगल हे एक ॲप्लिकेशन आहे, अर्थात एक निर्जीव गोष्ट आहे. गूगल एखादी व्यक्ती नाही आहे की जी माहिती हवी आहे ते नीट समजून घेईल आणि नंतर मागणाऱ्याला पुरवेल. गूगल तुम्ही दिलेल्या शब्दांवरून हवी असलेली गोष्ट सर्च करतो. दिलेल्या शब्दांमधून तो तसेच शब्द कोणत्या वेबसाइटवर आहेत हे शोधतो. आणि रिजल्ट देतो. आणि म्हणूनच जरी काही सर्च करताना व्याकरण चुकले तरी तो चुकीचा रिजल्ट देत नाही.

काही सर्च करायचे असेल गूगलवर तर मोजके शब्द लिहिले तरी काम होऊ शकते. [ संदर्भ हवा ][1][2]

गूगलच्या दुसऱ्या सर्व्हिसचे नाव जीमेल आहे. जीमेल वापरून एखादा विनामूल्य ईमेल पाठवू शकतो.

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.