![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/48/Kurma_deva.jpg/640px-Kurma_deva.jpg&w=640&q=50)
कूर्म अवतार
भगवान विष्णु यांचा कासवरूपातील अवतार / From Wikipedia, the free encyclopedia
कूर्म अवतार याला 'कच्छप अवतार' [1] देखील म्हणतात.हा श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो,देव व दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रात समुद्रमंथन केले होते. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. त्यावेळी भगवान विष्णूनी कूर्मावतार घेतला. कुर्मावताराच्या (कासवाच्या) रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. त्यामुळे देव आणि दानव सहजपणे समुद्र मंथन करू लागले. या समुद्रमंथनातून चौदा रत्ने मिळवले. कासव हे लक्ष्मीचे प्रतीक आहे.कुर्मा जयंतीचा सण वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला[2] साजरा केला जातो.
जलद तथ्य
कूर्म अवतार | |
![]() कूर्मावताराचे चित्र | |
मराठी | कूर्म अवतार |
संस्कृत | कूर्मावतारः |
कन्नड | ಕೂರ್ಮಾವತಾರ |
तमिळ | கூர்ம_அவதாரம் |
या अवताराची मुख्य देवता | विष्णू |
नामोल्लेख | भगवतपुराण ,महाभारत ,विष्णू पुराण,पद्मपुराण,लिङ्गपुराण |
तीर्थक्षेत्रे | श्रीकुर्मम् कुर्मनाथस्वामी मंदिर श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश |
बंद करा
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d1/Kurma_Avatar_on_a_brass_chariot_of_Searsole_Rajbari%2C_West_Bengal%2C_India.jpg/640px-Kurma_Avatar_on_a_brass_chariot_of_Searsole_Rajbari%2C_West_Bengal%2C_India.jpg)