कादंबिनी गांगुली
From Wikipedia, the free encyclopedia
कादंबिनी बोस गांगुली (१८ जुलै १८६१ ते ३ ऑक्टोबर १९२३[1]) या भारतातील वैद्यकीय डॉक्टर होत्या. आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी घेऊन सराव करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. १८८४ मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या गांगुली ह्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर त्यांनी स्कॉटलंडमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारतात यशस्वी वैद्यकीय सराव सुरू केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील त्या पहिल्या महिला वक्त्या होत्या.
जलद तथ्य कादंबिनी गांगुली, जन्म ...
कादंबिनी गांगुली | |
---|---|
जन्म |
कादंबिनी बोस (কাদম্বিনী বসু) १८ जुलै १८६१ भागलपूर, बंगाल, ब्रिटिश भारत (आता बिहार, भारत) |
मृत्यू |
३ ऑक्टोबर, १९२३ (वय ६२) कलकत्ता, बंगाल, ब्रिटिश भारत (आता पश्चिम बंगाल, भारत) |
शिक्षण |
|
पेशा | डॉक्टर |
जोडीदार | |
अपत्ये | ८ |
बंद करा