कझाकस्तान
देश / From Wikipedia, the free encyclopedia
कझाकस्तान (कझाक: Қазақстан; रशियन: Казахстан), अधिकृत नाव कझाकस्तानाचे प्रजासत्ताक (कझाकः Қазақстан Республикасы, कझाकस्तान रेस्पुब्लिकासी; रशियन: Республика Казахстан, रेस्पुब्लिका कझाकस्तान) हा मध्य आशिया आणि पूर्व युरोपातील संधिप्रदेशावर वसलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार नवव्या क्रमांकाचा हा देश जगातील सर्वांत मोठा भूवेष्टित देश आहे. याचे २७,२७,३०० वर्ग कि.मी. विस्तारलेले क्षेत्रफळ पश्चिम युरोपाहून मोठे आहे. जगभरातील ६ सार्वभौम तुर्की देशांपैकी तो एक आहे. रशिया, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, चीन या देशांना आणि कास्पियन समुद्राला लागून याच्या सीमा आहेत. मंगोलियाशी याच्या सीमा थेट भिडल्या नसल्या, तरीही मंगोलियाच्या सर्वांत पश्चिमेकडील टोकापासून याची पूर्व टोकाकडील सीमा केवळ ३८ कि.मी. अंतरावर आहे. इ.स. १९९७ साली कझाकस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या अल्माटीपासून देशाची राजधानी हलवून नुरसुल्तान येथे नेण्यात आली.
कझाकस्तान Қазақстан Республикасы Qazaqstan Respublïkası Республика Казахстан Respublika Kazakhstan कझाकस्तान प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: मेनिन कझाकस्तानिम | |||||
कझाकस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | नुरसुल्तान | ||||
सर्वात मोठे शहर | अल्माटी | ||||
अधिकृत भाषा | कझाक | ||||
- राष्ट्रप्रमुख | Kassym-Jomart Tokayev | ||||
- पंतप्रधान | करीम मासीमोव | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (सोवियेत संघ पासून) १६ डिसेंबर, इ.स. १९९१ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २७,२७,३०० किमी२ (८ [1]वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.७ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १५,२१७,७११ कझाकस्तानी राष्ट्रीय संकेतस्थळ (६२वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ५.४/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १,६१,१५५ अब्ज अमेरिकन डॉलर (५६वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १०,६५८ अमेरिकन डॉलर (६६वा क्रमांक) | ||||
राष्ट्रीय चलन | टेंगे | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | पुर्व/पश्चिम (यूटीसी +५/+६) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | KZ | ||||
आंतरजाल प्रत्यय | .kz | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +७ | ||||