From Wikipedia, the free encyclopedia
एहूद ओल्मर्ट (हिब्रू: אהוד אולמרט; ३० सप्टेंबर १९४५) हा इस्रायल देशामधील एक राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान आहे. इस्रायलच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेला ओल्मर्ट एरियेल शॅरनच्या मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होता. ४ जानेवारी २००६ रोजी पंतप्रधान असताना शॅरनला पक्षाघात झाल्यामुळे तो कोमामध्ये गेला व त्याच्या जागी कार्यवाहू पंतप्रधान म्हणून ओल्मर्टची निवड झाली. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुका ओल्मर्टच्या पक्षाने जिंकल्या व ओल्मर्ट इस्रायलचा १२वा पंतप्रधान बनला.
एहूद ओल्मर्ट | |
इस्रायलचा पंतप्रधान | |
कार्यकाळ १४ एप्रिल २००६ – ३१ मार्च २००९ | |
मागील | एरियेल शॅरन |
---|---|
पुढील | बिन्यामिन नेतान्याहू |
जेरूसलेमचा महापौर | |
कार्यकाळ १९९३ – २००३ | |
जन्म | ३० सप्टेंबर, १९४५ बिन्यामिना, हैफा जिल्हा, ब्रिटिश पॅलेस्टाइन |
पत्नी | अलिझा ओल्मर्ट |
धर्म | ज्यू |
३ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ओल्मर्टने मार्च २००९ मध्ये पंतप्रधानपद सोडले. सत्तेवर असताना भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर खटला भरला गेला होता.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.