एसबीआय कार्ड
From Wikipedia, the free encyclopedia
एसबीआय कार्ड एंड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी पूर्वी एसबीआय कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. ही कंपनी भारतात क्रेडिट कार्ड देण्याचे काम करते. एसबीआय कार्ड ऑक्टोबर १९९८ मध्ये सुरू झाली. भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जीई कॅपिटल यांनी मिळून सुरू केली. डिसेंबर २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि द कारलाईल ग्रुप [2] या दोघांनी जीई कॅपिटलची हिस्सेदारी वाटून घेतली. एसबीआय कार्डचे मुख्यालय गुडगाव, हरियाणा / दिल्ली एनसीआर येथे आहे. भारतभरातील १०० पेक्षा जास्त शहरांमध्ये याच्या शाखा आहेत.[3] ३१ मार्च २०१६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एसबीआय कार्डचा निव्वळ नफा ₹ २७१ कोटी आणि करापूर्वी नफा ₹४३८ कोटी होता.[4]
जलद तथ्य प्रकार, शेअर बाजारातील नाव ...
प्रकार | नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी |
---|---|
शेअर बाजारातील नाव | |
उद्योग क्षेत्र | आर्थिक सेवा |
स्थापना | १९९८ |
मुख्यालय | गुरगाव, भारत |
सेवांतर्गत प्रदेश | भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती | अश्विनीकुमार तिवारी |
उत्पादने | क्रेडिट कार्ड |
सेवा | क्रेडिट कार्ड, पेमेंट |
महसूली उत्पन्न | ७२,८६८.३५ दशलक्ष (US$१,६१७.६८ दशलक्ष) (२०१८ - १९)[1] |
निव्वळ उत्पन्न | ८,५९५.९७ दशलक्ष (US$१९०.८३ दशलक्ष) (२०१८ - १९)[1] |
एकूण मालमत्ता | २,०२,३९६.३६ दशलक्ष (US$४,४९३.२ दशलक्ष) (३१ मार्च २०१९)[1] |
कर्मचारी | ३६०० |
पालक कंपनी | स्टेट बँक ऑफ इंडिया आणि द कार्लाईल ग्रुप |
संकेतस्थळ | www.sbicard.com |
बंद करा