From Wikipedia, the free encyclopedia
एम. ए. चिदंबरम मैदान किंवा चेपॉक मैदान हे भारतातील चेन्नई शहरातील क्रिकेट मैदान आहे. मैदानाची स्थापना १९१६ साली झाली असून देशातील हे सर्वात जुने आणि सतत वापरात असणारे क्रिकेट मैदान आहे. पूर्वी मद्रास क्रिकेट क्लब मैदान म्हणून ओळखले जाणाऱ्या ह्या मैदानाचे नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष एम. ए. चिदंबरम ह्यांच्या नावावरून देण्यात आले आहे. तामिळनाडू क्रिकेट संघ आणि भारतीय प्रीमियर लीगमधील संघ, चेन्नई सुपर किंग्स ह्या संघांचे हे होम ग्राउंड आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | चेपॉक, चेन्नई |
स्थापना | १९१६ |
आसनक्षमता | ३८,०००[1] |
मालक | तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन |
आर्किटेक्ट |
इस्ट कोस्ट कन्स्ट्रक्शन्स हॉपकिन्स आर्किटेक्ट्स, लंडन[2] |
प्रचालक | तमिळनाडू क्रिकेट संस्था |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
१०-१३ फेब्रुवारी १९३४: भारत वि. इंग्लंड |
अंतिम क.सा. |
२२-२६ फेब्रुवारी २०१३: भारत वि. ऑस्ट्रेलिया |
प्रथम ए.सा. |
९ ऑक्टोबर १९८७: भारत वि. ऑस्ट्रेलिया |
अंतिम ए.सा. |
२२ ऑक्टोबर २०१५: भारत वि. दक्षिण आफ्रिका |
एकमेव २०-२० |
११ सप्टेंबर २०१२: भारत वि. न्यू झीलंड |
यजमान संघ माहिती | |
तमिळनाडू (१९१६-सद्य) चेन्नई सुपर किंग्स (आयपीएल) (२००८-२०१५) | |
शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०१६ स्रोत: Cricinfo (इंग्लिश मजकूर) |
चेपॉकमध्ये पहिली कसोटी १० फेब्रुवारी १९३४ साली सुरू झाली, तर सर्वात पहिला रणजी करंडक सामना येथे १९३६ साली खेळवला गेला. भारतीय क्रिकेट संघाला ह्या मैदानावर त्यांचा पहिला कसोटी विजय मिळाला तो १९५२ साली इंग्लंडविरुद्ध. चेपॉक येथे १९८६ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवला गेलेला कसोटी सामना हा कसोटी इतिहासातील बरोबरीत सुटलेला फक्त दुसरा कसोटी सामना होता.[3][4]
बंगालच्या उपसागराच्या बाजूला मरिना समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर चेपॉक येथे हे मैदान वसलेले आहे. मैदानामध्ये उत्तरेकडून वाल्लाजाह मार्ग, पश्चिमेकडून बाबू जगजीवनराम मार्ग आणि दक्षिणेकडून पेक्रॉफ्ट मार्ग येथून प्रवेश केला जावू शकतो. मैदानाच्या पूर्वेदिशेलगत चेपॉक एमआरटीएस रेल्वे स्थानक आहे, जे चेन्नई समुद्रकिनाऱ्यावर आहे. मैदानाच्या उत्तरेला एका रेषेत कुवम नदी वाहते.
चेपॉकचा प्रेक्षकवर्ग हा देशातील सर्वात खिलाडू आणि दाद देणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.[1] १९९७ साली भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १९४ धावा केल्यानंतर सईद अन्वरचे चेन्नईच्या प्रेक्षकांनी उभे राहून अभिवादन केले होते. त्यानंतर पुन्हा १९९९ साली पाकिस्तानी संघाने कसोटी सामना जिंकल्यानंतरही प्रेक्षकांनी त्यांना दाद दिली होती आणि प्रेक्षकांनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल पाकिस्तानी संघाने लॅप ऑफ ऑनर[मराठी शब्द सुचवा] केला होता.[1]
जून २००९ मध्ये, १७५ कोटी (US$३८.८५ दशलक्ष) इतक्या किंमतीत मैदानाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले..[5][6] बांधकामाच्या योजनेमध्ये १०,००० प्रेक्षक बसू शकतील असे पोलादाच्या जाळीने मजबूत केलेले कॉंक्रिटचे आय, जे आणि के स्टॅंड आणि अर्धपारदर्शक पीटएफई पडद्याचे छत असलेले २४ आदरातिथ्याचे बॉक्स यांचा समावेश होता.[7] तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने बांधकामासाठी हॉपकिन्स आर्किटेक्ट्स, लंडन आणि नटराज व वेंकट आर्किटेक्ट्स, चेन्नई यांना कंत्राट दिले होते.[2]
मैदानाचे नूतनीकरण २०११ मध्ये पूर्ण झाले आणि जूने खांबांच्या आधारावरचे छप्पर ज्यामुळे मैदान दिसण्यात अडचण होत असे त्याची जागा नवीन आणि वजनाने हलक्या चौकोनी आकाराच्या तारांनी एकत्र बांधलेल्या छपराने घेतली. सध्या मैदानाची प्रेक्षक क्षमता ३८,००० असून जी भविष्यात ४२,००० इतकी वाढवली जावू शकते. स्टॅंड्स 36° मध्ये चढते आहेत ज्यामुळे समुद्राची अल्हाददायक हवा घेता येते.[8]
३१ मार्च २०१५ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की मैदानाचे नूतनीकरण करताना सार्वजनिक सुरक्षा संबंधित नियमावलींचे उल्लंघन झाले आहे.[9][10] न्यायालयाने निकाल दिला की नियमांचे उल्लंघन करणारा नूतनीकरणाच्या भाग पाडण्यात यावा आणि योग्य नियोजन परवानग्या जोपर्यंत मिळत नाहीत तसेच बांधकाम पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत तीन स्टॅण्ड (आय, जे, के) सीलबंद राहिले पाहिजेत.[11][12] सध्या मैदानात क्रिकेट सामने खेळवताना आय, जे आणि के स्टॅंड प्रेक्षकांसाठी बंद आहेत.
चेपॉकवर सर्वात जास्त धावांचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यानी १९८५ मध्ये भारताविरुद्ध ७ बाद ६५२ धावा केल्या होत्या.[23] मैदानावरील सर्वात कमी धावांचा विक्रम भारताच्या नावावर आहे, इंग्लंडने भारताला अवघ्या ८३ धावांवर रोखले होते.[24] ह्या मैदानावार सर्वात जास्त १०१८ कसोटी धावा सुनील गावस्करने केल्या आहेत, त्यानंतर क्रमांक लागतो सचिन तेंडुलकर (९७० धावा) आणि गुंडप्पा विश्वनाथ (७८५ धावा) यांचा. ह्या मैदानावर सर्वात जास्त कसोटी बळी आहेत अनिल कुंबळेचे (४८ बळी) त्यानंतर हरभजन सिंग (४२ बळी) आणि कपिल देव (४० बळी) यांचा क्रमांक लागतो.
चेपॉकवर सर्वात मोठी एकदिवसीय धावसंख्या १९९७ साली पाकिस्तानने भारताविरुद्ध उभारली होती (५ बाद ३२७), उत्तरादाखल भारताने सर्वबाद २९२ धावा केल्या, ही येथील तिसरी सर्वात मोठी धावसंख्या. दुसरी सर्वात मोठी एकदिवसीय धावसंख्या ८ बाद २९९ ही भारताने २२ ऑक्टोबर २०१५ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती, हा सामना भारताने जिंकला होता. एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वात जास्त ३२२ धावा ह्या मैदानावर महेंद्रसिंग धोणीने केल्या आहेत[25] तर मोहम्मद रफिकने सर्वाधिक ८ एकदिवसीय बळी मिळवले आहेत. भारतीय गोलंदाजातर्फे अजित आगरकरने येथे सर्वाधिक ७ बळी मिळवले आहेत.[26]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.