एच.ए.एल. तेजस
From Wikipedia, the free encyclopedia
एच.ए.एल. तेजस (रोमन लिपी: HAL Tejas;) हे हलक्या वजनाच्या लढाऊ विमानवर्गातील अर्थात लाइट कॉंबॅट एरक्राफ (एल.सी.ए.) वर्गातील संपूर्ण भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. इ.स. १९८३ साली एल.सी.ए. हा कार्यक्रम भारतीय शासनातर्फे हाती घेण्यात आला. इ.स. १९७० च्या दशकापासून भारतीय वायु सेना रशियन बनावटीच्या मिग २१ व मिग २३ अवलंबून होती. इ.स. १९९० च्या दशकात या विमानांचा सुमारे २० वर्षांचा सेवाकाळ संपल्यावर वायुसेनेत मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच विदेशी बनावटीच्या विमानांवरील अवलंबन कमी व्हावे हासुद्धा विचार त्यामागे होता [ संदर्भ हवा ].
हा लेख एच.ए.एल. तेजस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, तेजस (निःसंदिग्धीकरण).
हा लेख २ ऑक्टोबर, २०१० रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. | २०१०चे इतर उदयोन्मुख लेख |
जलद तथ्य एच.ए.एल. तेजस, प्रकार ...
एच.ए.एल. तेजस | |
---|---|
एच.ए.एल. तेजस | |
प्रकार | बहुउद्देशीय लढाऊ विमान |
उत्पादक देश | भारत |
उत्पादक | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड |
पहिले उड्डाण | ४ जानेवरी २००१ |
समावेश | १७ जानेवारी २०१५[1] |
सद्यस्थिती | सेवेमध्ये आहे[2] |
मुख्य उपभोक्ता | भारतीय वायु सेना |
उत्पादन काळ | २००१ पासून सुृृृरू |
उत्पादित संख्या | १६ |
एकूण कार्यक्रमखर्च | ₹७,३९९.६९ करोड ($१ अब्ज) (२०१५ मधील एलसीए एकूण)[3] |
प्रति एककी किंमत | ₹१६० करोड ($२.४ करोड) मार्क १ साठी[4] ₹२७५ करोड ($४.१ करोड) - ₹३०० करोड ($४.५ करोड) मार्क १ए साठी[4][5] |
बंद करा