From Wikipedia, the free encyclopedia
उ थांट (बर्मी: ဦးသန့်; ; २२ जानेवारी १९०९ - २५ नोव्हेंबर १९७४) हा एक बर्मी राजकारणी व संयुक्त राष्ट्रांचा तिसरा सरचिटणीस होता. तो सरचिटणीस पदावर १९६१ ते १९७१ दरम्यान होता.
उ थांट | |
संयुक्त राष्ट्रांचा तिसरा सरचिटणीस | |
कार्यकाळ ३० नोव्हेंबर १९६१ – ३१ डिसेंबर १९७१ | |
मागील | दाग हामारहोएल्ड |
---|---|
पुढील | कर्ट वाल्डहाइम |
जन्म | २२ जानेवारी १९०९ पंतनाव, बर्मा, ब्रिटिश भारत |
मृत्यू | २५ नोव्हेंबर, १९७४ (वय ६५) न्यू यॉर्क शहर, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | बर्मी |
धर्म | थेरवादी बौद्ध |
सही |
बर्माचा पहिला पंतप्रधान उ नुचा जवळचा मित्र असलेला थांट नुच्या मंत्रीमंडळामध्ये विविध खात्यांवर राहिला होता. १९६१ साली दाग हामारहोएल्डच्या अपघाती मृत्यूनंतर थांटची सरचिटणीसपदावर नियुक्ती झाली. थांटने १९६२ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी व सोव्हिएत अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह ह्यांच्या दरम्यान सलोखा घडवून आणण्याचे व क्युबामधील युद्धसदृष परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न केले. व्हियेतनाम युद्धामधील अमेरिकेच्या भूमिकेवर थांटने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.