![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e1/Irish_Sea_satellite_image.jpg/640px-Irish_Sea_satellite_image.jpg&w=640&q=50)
आयरिश समुद्र
समुद्र / From Wikipedia, the free encyclopedia
आयरिश समुद्र (आयरिश: Muir Éireann,[1] मांक्स: Y Keayn Yernagh}},[2] स्कॉट्स: Erse Sea, स्कॉटिश गेलिक: Muir Èireann,[3], वेल्श: Môr Iwerddon) हा युरोपातील ग्रेट ब्रिटन व आयर्लंड ह्या बेटांना वेगळे करणारा एक समुद्र आहे. अटलांटिक महासागराचा भाग असलेल्या ह्या समुद्राच्या उत्तरेस उत्तर अटलांटिक समुद्र, दक्षिणेस सेल्टिक समुद्र, पूर्वेस ग्रेट ब्रिटन बेटावरील युनायटेड किंग्डमचे स्कॉटलंड, इंग्लंड व वेल्स हे घटक देश तर पश्चिमेस आयर्लंड बेटावरील युनायटेड किंग्डमचे उत्तर आयर्लंड तसेच आयर्लंडचे प्रजासत्ताक हा देश आहेत. ब्रिटनचे आईल ऑफ मान हे विशेष दर्जा असलेले बेटही ह्याच समुद्रात स्थित आहे. ब्रिटन व आयर्लंड बेटांना जोडणारा बोगदा अथवा पूल नसल्यामुळे ह्या समुद्रामधून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक होते.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e1/Irish_Sea_satellite_image.jpg/320px-Irish_Sea_satellite_image.jpg)