अल्माटी
From Wikipedia, the free encyclopedia
अल्माटी (कझाक: Алматы; रशियन: Алма-Ата), जुने नाव अल्मा-अता (रशियन: Алма-Ата) हे मध्य आशियाच्या कझाकस्तान देशामधील सगळ्यात मोठे शहर आहे. सुमारे १४ वस्ती असलेल्या ह्या शहरामध्ये कझाकस्तानमधील ९% नागरिक राहतात. अल्माटी हे १९२९ ते १९९१ दरम्यान सोव्हिएत संघाच्या कझाक सोव्हिएत साम्यवादी गणराज्याचे तर १९९१ ते १९९७ दरम्यान स्वतंत्र कझाकस्तान देशाच्या राजधानीचे शहर होते. १० डिसेंबर १९९७ रोजी कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे हलवण्यात आली.[2]
जलद तथ्य
अल्माटी Алматы |
|||
कझाकस्तान देशाची राजधानी | |||
अल्माटीमधील झेन्कोव्ह कॅथेड्रल ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात उंच लाकडी इमारत आहे. |
|||
|
|||
गुणक: 43°16′39″N 76°53′45″E |
|||
देश | कझाकस्तान | ||
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ९ वे शतक | ||
क्षेत्रफळ | ३२४.८ चौ. किमी (१२५.४ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासून उंची | कमाल ५,५७७ फूट (१,७०० मी) किमान १,६४० फूट (५०० मी) |
||
लोकसंख्या | |||
- शहर | १७,०३,४८१[1] | ||
- घनता | २,५०० /चौ. किमी (६,५०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० | ||
http://www.almaty.kz/ |
बंद करा
आजच्या घडीला अल्माटी कझाकस्तानचे आर्थिक, सांस्कृतिक व वाणिज्य केंद्र मानले जाते. अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ कझाकस्तानमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून एर अस्ताना ह्या विमानवाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.