![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/0c/Arun_Jaitley_Stadium_during_India_vs_Australia_2019_ODI.jpg/640px-Arun_Jaitley_Stadium_during_India_vs_Australia_2019_ODI.jpg&w=640&q=50)
अरुण जेटली स्टेडियम
From Wikipedia, the free encyclopedia
भारतातील नवी दिल्लीच्या बहादूर शाह झाफर मार्ग येथे अरुण जेटली क्रिकेट मैदान (पुर्वीचे फिरोजशहा कोटला मैदान) वसलेले आहे.[2] मैदानाची स्थापन १८८३ मध्ये झाली कोलकाता येथील इडन गार्डन्स नंतर, सध्या चालू स्थितीतील ते भारतातील दुसरे मैदान आहे. २०१६ पर्यंत, शेवटची कसोटी सामन्यांमध्ये २८ वर्षे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १० वर्षे या मैदानावर भारतीय क्रिकेट संघ अजिंक्य राहिला आहे.[3] अनिल कुंबळेचे पाकिस्तानविरुद्ध एका कसोटी डावातील १० बळी, सुनील गावसकरला मागे टाकून ३५ शतकांसह सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम आणि त्या आधी डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी गावसकरने केलेली बरोबरी अशा उल्लेखनीय घटनांमुळे हे मैदान लक्षात राहते.
जलद तथ्य मैदान माहिती, स्थान ...
![]() | |
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बहादूर शहा झाफर मार्ग, दिल्ली |
गुणक | 28°38′16″N 77°14′35″E |
स्थापना | १८८३[1] |
आसनक्षमता | ४८,०००[2] |
मालक | दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन |
प्रचालक | दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन |
यजमान |
भारतीय क्रिकेट संघ दिल्ली क्रिकेट संघ दिल्ली डेरडेव्हिल्स |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
१०-१४ नोव्हेंबर १९४८: भारत वि. वेस्ट इंडीज |
अंतिम क.सा. |
३-७ डिसेंबर २०१५: भारत वि. दक्षिण आफ्रिका |
प्रथम ए.सा. |
१५ सप्टेंबर १९८२: भारत वि. श्रीलंका |
अंतिम ए.सा. |
२० ऑक्टोबर २०१६: भारत वि. न्यू झीलंड |
प्रथम २०-२० |
२३ मार्च २०१६: अफगाणिस्तान वि. इंग्लंड |
अंतिम २०-२० |
३० मार्च २०१६: इंग्लंड वि. न्यू झीलंड |
शेवटचा बदल १ जानेवारी २०१७ स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
बंद करा