अजिंठा-वेरुळची लेणी
From Wikipedia, the free encyclopedia
मराठी विकिपीडियावर अजिंठा आणि वेरुळ लेणीचे स्वतंत्र लेख असणे अभिप्रेत आहे तसे दुवे वर दिले आहेत. अजिंठा-वेरुळची लेणी हा एकत्र लेख त्या दोन लेखांवर बेतलेला असणे अभिप्रेत आहे. हा लेख पुर्वी मासिक सदर होऊन गेला आहे, तेव्हा लेखाचे संपादन खुले असले तरी या लेखाचे स्थानांतरण कनफ्यूजन्स टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत केले गेले आहे.
![]() |
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा-वेरूळची लेणी ही सातवाहन,वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्माण झाली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत.
प्रामुख्याने बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण औरंगाबादपासून १०० कि.मी. ते ११० कि. मी. वर आहे.व जळगाव पासून फक्त 60 km अंतरावर आहे. सुमारे एक हजार वर्षेपर्यंत या ठिकाणी बौद्धांचे एक महत्त्वाचे केंद्र होते असे मानले जाते.[1]
वेरूळ हे भारतातील, पूर्वीच्या निजामाच्या हैदराबाद संस्थानातील व आताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातले गाव पाषाणातील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. इ.स. १९८३ साली वेरूळ लेणी 'युनेस्को जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केली गेली.