तापी नदी
भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी / From Wikipedia, the free encyclopedia
तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही पश्चिमवाहिनी नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पश्चिम भाग, खानदेश, व गुजरातमधील सुरत जिल्हा समाविष्ट आहे. तापी नदीची मुख्य उपनदी ही पूर्णा नदी आहे.
जलद तथ्य तापी, इतर नावे ...
तापी | |
---|---|
सुरत जवळील तापी नदी | |
इतर नावे | ताप्ती |
उगम | मुलताईजवळ |
मुख | अरबी समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात |
लांबी | ७२४ किमी (४५० मैल) |
उगम स्थान उंची | ७४९ मी (२,४५७ फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ६५,१४५ |
उपनद्या | पूर्णा, गिरणा नदी, वाघूर |
धरणे | उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण |
बंद करा