कन्नड तालुका
महाराष्ट्रातील शहर आणि तालुका, भारत / From Wikipedia, the free encyclopedia
कन्नड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. कन्नड या गावी या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. कन्नड शहर हे तीन दरवाज्याचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते कन्नड शहरात माळीवाडा येथे वेश (दरवाजा) असून दुसरा दरवाजा काली मस्जिद समोर होता व तिसऱ्या दरवाजाचे आस्तीत्व उपलब्ध नाही. कन्नड शहराला आज कन्नड नावाने जाते मात्र जुने लोक या शहराचे नाव कनकावती होते असे सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा येथे जात असताना कन्नड तालुक्यातील शिवराई ह्या गावात महाराजांचा मुक्काम झाला होता असाही इतिहास आहे. १८८४च्या इंग्रत राजवटीतील गॅजेट मध्ये कन्नड शहराचा उल्लेख ब्राम्हणी नदी व शिवना नदीच्या संगमावर वसलेले शहर अशी नोंद आहे. त्यामध्ये कन्नड शहराचे नाव कन्हेर असे नमुद आहे. या ठिकाणी १८९८ पर्यंत इंग्रज वसाहत लष्कर परिसरात आस्तित्वास असल्याचे दिसते. त्या दरम्यानचे ख्रिश्चन स्मशानभुमी समर्थनगर परिसरात आज ही आस्थिवात आहे. कन्नड पासून पितळखोरा लेण्या केवळ २० किमी अंतरावर आहेत. वेरूळ लेण्या २८ की.मी तर अजिंठ्याच्या लेण्या १०० किमी अंतर वर आहेत. प्रसिद्ध गौताळा अभयारण्य पाच किमी अंतरारून सुरू होते. कै आमदार नारायणराव पाटील नागदकर यांनी तालुक्याचा विकास चांगल्या प्रकारे केलेला आहे. महाविद्यालयाची स्थापना, मार्केट कमिटीला जागा, एसटी थांब्याची जागा, या साठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तालुक्यातील लागवड क्षेत्र १०५६६०.२३ , खरीप गावे-१५६,रब्बी गावे ५६. खरीप क्षेत्र-८६०००, रब्बी क्षेत्र- १९६६०.२३. तालुक्यातील प्रमुख नद्या-शिवना, ब्राह्मनि, अंजना, पूर्णा.मध्यम प्रकल्प- अंबाडी ( आताचे नाव. कै.नारायणराव गीरामाजी पाटील प्रकल्प), गडदगड,.तालुक्यातील ओळीत खातेदारांची संख्या- ६२६७७. कन्नड शहराची लोकसंख्या-३४४०३. तालुक्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या- ३५६८६४. तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा तीन- ब्राम्हणी, वडनेर आणि नागद. स्वस्त द्यान्य दुकाने २०६ +३०. प्राथमिक शाळा २२८, केंद्रीय प्राथमिक २१,माध्यमिक जी.प. -६, खाजगी - ६१, ऐतिहासिक स्थळे- पितळखोरा लेण्या, किले अंतुर, सितान्हान्ही, 'उंच डोंगर"- सुरपाळा. अभयारण्य- गौताळा अभयारण्य. शहरातील महाविध्यालाये दोन+ अध्यापक वि.२+अपंग अध्या.१ अभ्यासक- गणिततज्ञ भास्कराचार्य, ज्योतिषचार्य व कवी दादागुरू जोशी , अहिराणीचे अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचे या शहरात वास्तव्य.स्वातंत्र चळवळचे मिश्रीलाल पहाडे, सहकार चळवळचे रामचंद्र पाटील, क्रांतीच्या चळवळचे काकासाहेब देशमुख, ग्रामसुधारणेचे रामराव अन्ना बहिरगावकर, तालुक्याचा विकास महर्षी अप्पासाहेब नारायण गीरामाजी पाटील नागदकर यांचे वास्तव्य येथलेच.
कन्नड तालुका कन्नड तालुका | |
---|---|
20.27°N 75.13°E / 20.27; 75.13 | |
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | छत्रपती संभाजीनगर जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | छत्रपती संभाजीनगर विभाग |
मुख्यालय | कन्नड |
लोकसंख्या | २,९१,२६७ (२०११) |
शहरी लोकसंख्या | ४०७५९ |
प्रमुख शहरे/खेडी | कन्नड, नागद, पिशोर, ऐकून खेडी २४४ |
तहसीलदार | देवेंद्र काळे |
लोकसभा मतदारसंघ | छत्रपती संभाजीनगर (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | कन्नड विधानसभा मतदारसंघ |
आमदार | उदयसिंग राजपूत |
पर्जन्यमान | ७४९.२ मिमी |
कार्यालयीन संकेतस्थळ |